Axar Patel 3 consecutive sixes Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: 6,6,6,... अन् अक्षरने वाढवलं श्रीलंकन टीमचं टेन्शन, पाहा व्हिडिओ

अक्षर पटेलने श्रीलंकेविरुद्ध षटकारांची हॅट्रिक केली होती.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर गुरुवारी पार पडला. या सामन्यात भारताला 16 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण भारताकडून अक्षर पटेलने विजय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे सध्या कौतुक होत आहे.

या सामन्यात भारताला श्रीलंकेने 207 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय वरची फळी झटपट बाद झाली. एक वेळ अशी होती की भारताचा अर्धा संघ 57 धावांवर बाद झाला होता. पण त्यानंतर सूर्यकुमार कुमार आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सांभाळला आणि सहाव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.

सूर्यकुमार आणि अक्षर यांनी आक्रमक फलंदाजी करताना वैयक्तिक अर्धशतकेही साजरी केली. अक्षरने तर 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याने वनिंदू हसरंगाने गोलंदाजी केलेल्या 14 व्या षटकात तर सलग तीन षटकार मारले. त्याने हे तिन्ही षटकार 14 व्या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूवर ठोकले. त्याच्या या तिन्ही षटकारांनी सामन्यात रोमांच आणला होता.

त्याच्यानंतर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवनेही एक षटकार ठोकला. त्यामुळे या संपूर्ण षटकात 26 धावा निघाल्या. त्यानंतरही या दोघांनी चांगला खेळ सुरू ठेवला होता. मात्र, 16 व्या षटकात सूर्यकुमार यादव 51 धावांवर बाद झाला. पण त्यानंतरही अक्षर पटेलला शिवम मावीने साथ दिली होती.

व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 21 धावांची गरज होती. मात्र, श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने या षटकात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि अक्षर पटेलला 65 धावांवर आणि शिवम मावीला 26 धावांवर बाद केले. त्यामुळे भारताचा डाव 20 षटकात 8 बाद 190 धावांवर संपला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून दसून शनकाने सर्वाधिक 56 धावांची नाबाद खेळी केली, तसेच कुशल मेंडिलने 52 धावांची खेळी केली. पाथम निसंकाने 33 आणि चरिथ असलंकाने 37 धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 206 धावा केल्या. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान आता मालकेत 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने 7 जानेवारी रोजी होणारा तिसरा टी20 सामना निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT