Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SA: पहिल्या T20 मध्ये हे 4 खेळाडू बनतील मॅच विनर, तिरुअनंतपुरमची खेळपट्टी...

India vs South Africa, 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीन फील्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे

दैनिक गोमन्तक

Ind Vs Sa 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीन फील्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आज संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाणार आहे. तिरुअनंतपुरमच्या खेळपट्टीबद्दल फारसा अंदाज लावता येत नाही.

दरम्यान, भारताने आतापर्यंत तिरुवनंतपुरममध्ये दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एक सामना जिंकला आहे आणि एक सामना गमावला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदाच या मैदानावर सामना होणार आहे. भारताचे 4 खेळाडू आहेत, जे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 'सर्वात मोठा सामना विजेता' ठरतील.

1. विराट कोहली

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सर्वात मोठा सामना विजेता ठरु शकतो. कोहलीची धावांची भूक पुन्हा वाढली आहे. त्याने आता स्वबळावर भारतासाठी सामने जिंकून देण्यास सुरुवात केली आहे. जवळपास तीन वर्षे खराब फॉर्मशी झुंज दिल्यानंतर कोहलीने एक महिन्याचा ब्रेक घेतला होता. आशिया कपमध्ये तो फॉर्ममध्ये परतला असून त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी केली.

दुसरीकडे, विराट कोहली झंझावाती फलंदाजी करण्यात माहिर आहे. विराट क्रीझवर येताच गोलंदाजांची पळता भुई थोडी होते. मधल्या फळीत विराट कोहली हा टीम इंडियाची (Team India) सर्वात मोठी स्ट्रेन्थ आहे. कोहली हा टीम इंडियाचा सर्वात मोठा फलंदाज आहे. जेव्हा तो मधल्या फळीत खेळतो तेव्हा संपूर्ण संघ त्याच्याभोवती खेळतो.

2. रोहित शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सर्वात मोठा सामना विजेता ठरु शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा आपला जलवा दाखवू शकतो. रोहित शर्मा हा असा फलंदाज आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक 3694 धावा, सर्वाधिक 177 षटकार आणि सर्वाधिक 4 शतके झळकावली आहेत.

3. सूर्यकुमार यादव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादव सर्वात मोठा सामना विजेता ठरु शकतो. सूर्यकुमार यादव हा सध्या जगातील सर्वात धोकादायक T20 फलंदाज मानला जातो. सूर्यकुमार 360 अंशाच्या कोनात चौकार आणि षटकार मारतो. हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावांची खेळी केली.

तसेच, सूर्यकुमार यादवच्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 191.67 होता. सूर्यकुमार यादवच्या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 6 गडी राखून जिंकला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवची बॅट फटकेबाजीसाठी सज्ज झाली आहे.

4. जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात जसप्रीत बुमराह सर्वात मोठा सामना विजेता ठरु शकतो. अशा परिस्थितीत बुमराहला सामोरे जाणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी खूप कठीण जाणार आहे. जसप्रीत बुमराह जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहच्या घातक यॉर्कर्स आणि बाऊन्सर्संना तोंड देणे हे विरोधी फलंदाजांसाठी दुःस्वप्नसारखे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT