Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs PAK: ही कमजोरी दूर करण्यावर रोहितचे लक्ष, अन्यथा...

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Pakistan T20 World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा दोन्ही देशांचे चाहते खूप उत्सुक असतात. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाची एक मोठी कमजोरी दूर करावी लागणार आहे. अन्यथा हीच कमजोरी पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात भारी पडू शकते.

ही पाकिस्तानविरुद्धची मोठी कमजोरी

बऱ्याच कालावधीनंतर हर्षल पटेलने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. मात्र आतापर्यंत त्याला त्याच्या नावानुसार कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही (South Africa) तो सपशेल फ्लॉप ठरला. त्याचबरोबर सराव सामन्यातही त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या जागी अर्शदीप सिंगचा समावेश करु शकतो.

भुवनेश्वर कुमार लयीत नाही

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आशिया कप 2022 मध्ये अजिबात लयीत दिसला नाही. 19 वे ओव्हर टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरले होते. रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या डेथ ओव्हर्समध्ये या समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा टीम इंडियाची ही कमजोरी पाकिस्तानविरुद्ध जड जाऊ शकते.

भारताचा वरचष्मा आहे

भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 8 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. भारतीय फलंदाजी संपूर्ण जगात सर्वात मजबूत मानली जाते. त्याचबरोबर पाकिस्तानच्या गोलंदाजीत शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफसारखे तगडे गोलंदाज आहेत. अशा परिस्थितीत हा सामना पाकिस्तानची गोलंदाजी आणि भारताची फलंदाजी यांच्यात असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT