Babar & Rohit  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय व्होलेटेज सामन्याची तारीख बदलणार! 'ही' मोठी अपडेट आली समोर

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक 2023 च्या हायप्रोफाईल सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक 2023 च्या हायप्रोफाईल सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC विश्वचषक 2023 चा मोठा सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

मात्र, आता ही धक्कादायक बातमी समोर येत आहे की, 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील या सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. नवरात्रौत्सवामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील या हाय-प्रोफाईल सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्याची तारीख बदलणार!

भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील 2023 विश्वचषकातील हा हायप्रोफाईल सामना पुन्हा शेड्यूल केला जाऊ शकतो. भारतात 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसी या सामन्याची तारीख बदलण्याचा विचार करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्याची तारीख बदलण्याचा सल्लाही सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला दिला आहे.

15 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये नवरात्रीची लगबग पाहायला मिळणार आहे, त्याचवेळी जगभरातील कानाकोपऱ्यातून क्रिकेट चाहते येथे हा सामना पाहण्यासाठी येतील.

ही अपडेट अचानक समोर आली

बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “सुरक्षा एजन्सींनी आम्हाला सांगितले आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायप्रोफाइल सामन्यांसाठी अहमदाबादमध्ये लाखो लोक जमणार आहेत.

अशा स्थितीत नवरात्रीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महासामन्याची नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे. सध्या आमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असून लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल.

हे सोपे काम नाही, कोणत्याही सामन्यामागे अनेक गोष्टींचा समावेश असतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. पण हो, परिस्थिती उद्भवली तर सुरक्षेचा विचार करुन, तारीख बदलायची गरज पडली तर निर्णय घेतला जाईल.''

27 जुलै रोजी बैठक बोलावली आहे

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 27 जुलै रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायप्रोफाईल सामन्याचे वेळापत्रक बदलण्यावर चर्चा होणार आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारताच्या यजमानपदी खेळवला जाईल. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या हायप्रोफाईल क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांची तात्पुरती वेळ सकाळी 10:30 आणि दुपारी 2:00 अशी ठेवण्यात आली आहे. विश्वचषक जवळ आल्याने सामन्यांच्या वेळेतही बदल केले जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

SCROLL FOR NEXT