Shubman Gill Double Century Celebration Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद...! सेलिब्रेशननंतर Gillच्या द्विशतकाचे टीम इंडियाने गायले गोडवे

Video: भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये शुभमन गिलच्या द्विशतकाचे सेलिब्रेशन करण्यात आले.

Pranali Kodre

Shubman Gill: भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिलने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामना खेळताना द्विशतकी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली. बुधवारी भारताचा न्यूझीलंडविरुद्ध हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला वनडे सामना झाला होता. या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यानंतर गिलच्या द्विशतकाबद्दल भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेश झाले. सामना झाल्यानंतर जेव्हा संघ ड्रेसिंग रुममध्ये आला, त्यावेळी गिलने केक कापला. यावेळी भारतीय संघातील सर्व खेळाडू तिथे होते. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी गिलच्या द्विशतकाचे कौतुकही केले आहे. गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. तो 23 व्या वर्षी अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच तो वनडेत द्विशतक करणारा जगातील आठवा आणि भारताचा पाचवा खेळाडू आहे.

त्याच्या या खेळीबद्दल बोलताना पंड्या म्हणाला, 'शानदार, मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. जरी मी कधी द्विशतक केले नसले तरी, ही मी पाहिलेली सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. खूप आकर्षक आणि सहज फटकेबाजी होती. मला क्वचितच अंगावर काटे येतात, पण जेव्हा त्याने द्विशतक केले, तेव्हा खरंच माझ्या अंगावर काटे उभे राहिले.'

तसेच भारताचा माजी कर्णधार विराट म्हणाला, 'मी जबरदस्त म्हणेल. जेव्हा त्याच्यानंतरची डावातील सर्वोत्तम धावसंख्या 40 धावा देखील नव्हती, ते लक्षात घेता, त्याची खेळी जबरदस्त होती. त्याची खेळी वरच्या दर्जाची होती.'

'तो आज पूर्णपणे त्याच्या लयीत होता. गेल्या अनेक वर्षांपासून अनेकजण त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलत आहेत. मी त्याला शुभेच्छा देईल. मला आशा आहे की तो भविष्यात अजून चांगली कामगिरी करेल. आज त्याला पाहाणे अहोभाग्य होते. शानदार खेळी.'

याशिवाय राहुल द्रविड, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, उमरान मलिक अशा अनेक भारतीय खेळाडूंनीही गिलच्या द्विशतकाचे कौतुक केले.

भारताने मालिकेत घेतली आघाडी

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत गिलनंतर भारताच्या डावात सर्वाधिक 34 धावांची खेळी कर्णधार रोहित शर्माने केली होती. तसेच हार्दिकने 31 धावा केल्या होत्या. पण गिलव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला 50 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता.

भारताने या सामन्यात 50 षटकात 8 बाद 349 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि हेन्री शिपली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 350 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 131 धावांवरच 6 विकेट्स गमावल्यानंतरही न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल आणि मिशेल सँटेनरने यांनी झुंज दिली. त्यांनी सातव्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली.

मात्र सँटेनर 46 व्या षटकात 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकात ब्रेसवेलही 140 धावा करून बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडचा डावही 49.2 षटकात 337 धावांवर संपुष्टात आला.

त्यामुळे भारताने हा सामना १२ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT