Prasidh Krishna Ruled Out Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठा बदल; प्रसिद्ध कृष्णा बाहेर, 'या' खेळाडूची एन्ट्री

Prasidh Krishna Ruled Out: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Sameer Amunekar

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली. प्रसिद्ध कृष्णाच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागात बदल करावा लागणार आहे. दरम्यान, त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

बीसीसीआयने आगामी वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी आकिब नबीचा संघात समावेश केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नबीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्याची महत्त्वाची संधी मिळणार आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संघात स्थान मिळाल्याने त्याच्याकडून वेगवान गोलंदाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत आकिब नबीला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आकिब नबीने शानदार कामगिरी केली. त्याने दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण सहा बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची आपली क्षमता दाखवून दिली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे त्याला न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांदरम्यान प्रसिद्ध कृष्णाला ही दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betoda Pollution Complaint: बेतोड्यातील दुर्गंधीवर मानवाधिकार आयोगाची नजर; युनायटेड स्पिरिट्सवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश

Goa Land Prices: पणजी, म्हापसा, कळंगुटमधील जमीन महागली; सरकारकडून 2026-27 चे किमान दर अधिसूचित

Panaji Traffic Management: नो-पार्किंग, पिकअप-ड्रॉप झोन अन् सीसीटीव्ही; पणजीतील वाहतुकीसाठी न्यायालयाचा ॲक्शन प्लॅन

खरी कुजबुज: कार्यकर्त्यांना तिकिटाची आस

Cricketer Attack: क्रिकेटपटूवर तलवारीने हल्ला; स्विमिंग पूलमध्ये बॉल गेल्याने वाद, 22 वर्षीय खेळाडू गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT