Umran Malik  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 3rd T20I: ...म्हणून चहल ऐवजी उमरानला Playing XI मध्ये, कॅप्टन पंड्याकडून स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात युझवेंद्र चहल ऐवजी उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (1 फेब्रुवारी) टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलला या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले असून त्याच्याऐवजी उमरान मलिकला संधी देण्यात आली आहे. बाकी दुसऱ्या टी20 सामन्यात खेळलेला संघ तिसऱ्या टी20 सामन्यासाठीही कायम आहे.

दरम्यान चहलला बाहेर करण्यामागचे कारण भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, 'उमरानला युझीऐवजी संधी दिली आहे, कारण खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करेल असे वाटत आहे.'

न्यूझीलंडचाही एक बदल

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही एक बदल करण्यात आला आहे. न्यूझीलंडने जेकॉब डफी ऐवजी बेन लिस्टरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. बाकी दुसऱ्या टी२०मध्ये खेळलेले खेळाडू तिसऱ्या टी20 सामन्यातही खेळताना दिसणार आहेत.

निर्णायक सामना

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना निर्णायक सामना आहे. कारण पहिला सामना न्यूझीलंडने आणि दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा सामना जो जिंकेल, तो मालिकाही नावावर करेल.

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

न्यूझीलंड संघ - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT