Shubman Gill | India vs New Zealand T20I  Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'शतकवीर' गिलचा थरार; चौकार-षटकारांची आतिषबाजी, पाहा Video

Video: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शुभमन गिलने शतकी खेळी करताना चौकार - षटकारांची बरसात केली.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी अहमदाबादला खेळवला गेला. या सामन्यात भारताने तब्बल 234 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये युवा फलंदाज शुभमन गिलच्या शतकाचा मोठा वाटा राहिला.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून ईशान किशन आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. दरम्यान, ईशान 1 धावेवर बाद झाल्यानंतरही गिलने त्याची लय कायम राखत शेवटपर्यंत आक्रमक खेळ केला.

गिलने या सामन्यात अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने अनेक आक्रमक फटके खेळताना चौकार षटकारांची बरसात करत पहिले आंतरराष्ट्रीय टी20 शतकही साजरे केले. त्याने 54 चेंडूत चौकार मारत त्याचे हे शतक केले. त्याने या सामन्यात एकूण 63 चेंडूत 126 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 12 चौकार आणि 7 षटकार मारले.

त्याच्या या आक्रमक खेळीदरम्यानच्या षटकारांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे.

(India vs New Zealand 3rd T20I: Shubman Gill hits 12 fours and 7 sixes during century inning)

गिलने हे शतक केल्याने आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी असा कारनामा केला होता.

दरम्यान बुधवारी झालेल्या सामन्यात शुभमन गिलने ईशान बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीबरोबर 80 धावांची, सूर्यकुमारबरोबर 38 धावांची आणि कर्णधार हार्दिक पंड्याबरोबर 103 धावांची भागीदारी केली.

विशेष म्हणजे हार्दिक बरोबर झालेल्या शतकी भागीदारीमध्ये गिलच्या तब्बल 71 धावांचा वाटा होता. तसेच त्याने अखेरीस हार्दिक बाद झाल्यावर दीपक हुडाबरोबर नाबाद 6 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT