Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: शतक एक, रेकॉर्ड्स अनेक! टीम इंडियाचा 'प्रिन्स' आता विराट-रोहितच्या पंक्तीत

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (1 फेब्रुवारी) तिसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताने 168 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1असा विजयही मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली. याबरोबरच त्याने अनेक विक्रम केले.

शुभमन गिलने तिसऱ्या टी20 सामन्यात 63 चेंडूत 126 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 12 चौकार आणि 7 षटकार मारले. हे गिलचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात किमान एक शतक करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी असा पराक्रम केला आहे.

इतकेच नाही, तर गिल 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये, कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील पाचवाच खेळाडू आहे. असा विक्रम यापूर्वी केवळ ख्रिस गेल, शेन वॉटसन, बाबर आझम आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंनाच करता आला आहे.

गिलने 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये एक शतक केले होते. तसेच त्याने आत्तापर्यंत कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 1 शतक केले आहे. त्याचबरोबर त्याने वनडेत चार शतके केली आहेत.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करणारा तो सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. त्याने 13 वर्षे 146 दिवस एवढे वय असताना हा विक्रम केला. यापूर्वी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. त्याने 23 वर्षे 241 दिवस एवढे वय असताना हा कारनामा केला होता.

सर्वोच्च टी20 धावा करणारा भारतीय

गिलने नाबाद 126 धावांची खेळी केल्याने तो आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने या यादीत विराट कोहलीच्या नाबाद 122 धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. विराटने 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी होती.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये गिल आणि विराटनंतर तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माची 118 धावांची खेळी आहे. रोहितने 2017 साली इंदोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 118 धावांची खेळी केली होती.

तसेच न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही शुभमन गिलच्या नावावर नोंदवला गेला आहे. गिलने न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वोच्च 208 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT