Abhishek Sharma century latest news : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जात असून, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १९८ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने मैदान गाजवले. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ३८ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले.
अभिषेक शर्माने आपल्या या धडाकेबाज खेळीत ११ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी साकारली. मात्र, ही आक्रमक खेळी संपुष्टात आली असून, अभिषेक झेलबाद होऊन माघारी परतला.
अभिषेक शर्माचं चौथं टी२० आंतरराष्ट्रीय शतक
हे अभिषेक शर्माच्या कारकिर्दीतील चौथे टी20 आंतरराष्ट्रीय शतक आहे. यापूर्वी त्याने अफगाणिस्तान, इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध शतके झळकावली होती. आता, या सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत शतक पूर्ण केले.
हे अभिषेकच्या कारकिर्दीतील दुसरे सर्वात जलद शतक आहे. यापूर्वी त्याने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 30 चेंडूंमध्ये शतक झळकावून इतिहास रचला होता.
अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवच्या विक्रमाची बरोबरी
अभिषेक शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादव आणि फिल सॉल्ट यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोघांनी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येकी चार शतके झळकावली.
अभिषेकनेही आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत. आता अभिषेक केवळ ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा यांच्या मागे आहे, ज्यांनी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येकी पाच शतके झळकावली आहेत. अभिषेक लवकरच या दोन्ही फलंदाजांचे विक्रम मोडू शकतो.
पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
5 - ग्लेन मॅक्सवेल
5 - रोहित शर्मा
4 - करणबीर सिंग
4 - फिल सॉल्ट
4 - सूर्यकुमार यादव
4 - अभिषेक शर्मा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.