Shubman Gill Century | India vs New Zealand 3rd T20I
Shubman Gill Century | India vs New Zealand 3rd T20I Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill: न्यूझीलंडला गिलचा शतकी 'दणका'! दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी (1 फेब्रुवारी) टी२० मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादला झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शुभमन गिलने शतकी खेळी केली आहे.

त्याने 54 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे गिलचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात किमान एक शतक करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे.

त्याच्यापूर्वी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी असा पराक्रम केला आहे.

(India vs New Zealand 3nd T20I: Shubman Gill scored 1st T20I century)

टी20मध्ये शतक करणारा सातवा भारतीय

गिल आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा 7 वा खेळाडू देखील ठरला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक चार शतके केली आहेत.

तसेच सूर्यकुमारने तीन शतके आणि केएल राहुलने दोन शतके केली आहेत. त्याचबरोबर सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक शतक केले आहे.

भारताचे न्यूझीलंडला 235 धावांचे आव्हान

बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून सलामीला ईशान किशन आणि शुभमन गिल उतरले. मात्र ईशान 1 धावेवर बाद झाला.

पण, त्यानंतर गिलला राहुल त्रिपाठीची चांगली साथ मिळाली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. पण अर्थशतक पूर्ण करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज असताना त्रिपाठी बाद झाला. त्याने 22 चेंडूत 44 धावा केल्या.

त्यानंतरही गिलने चांगला खेळ सुरू ठेवत आक्रमक फटके मारले. त्याने सूर्यकुमारबरोबर 38 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याने कर्णधार हार्दिक पंड्याला साथीला घेत 103 धावांची शतकी भागीदारी केली. विशेष म्हणजे १०३ धावांच्या भागीदारीमध्ये गिलच्या तब्बल 71 धावांचे योगदान होते.

गिल या सामन्यात शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 234 धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT