Hardik Pandya on Washington Sundar Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: 'टीम इंडियापेक्षा तो एकटाच न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता', पराभवानंतर कॅप्टन पंड्याचे भाष्य

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात पराभव झाल्यावर हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. रांचीमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने खेळपट्टीने दोन्ही संघांना चकीत केल्याचे म्हटले. तसेच त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या अष्टपैलू कामगिरीचेही कौतुकही केले.

या सामन्यात खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना साथ दिल्याचे दिसले होते. दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी सामन्यात चांगली कामगिरीही केली. याबद्दल सामन्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला, 'खेळपट्टी अशी असेल असा कोणीही विचार केला नव्हता. दोन्ही संघ चकीत झाले होते. पण न्यूझीलंड या खेळपट्टीवर चांगले खेळले. त्याचमुळे निकाल असा लागला.'

न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटेनर आणि ईश सोधी या तीन फिरकीपटूंनी मिळूनच भारताच्या 5 विकेट्स घेतल्या होत्या.

हार्दिकने असेही सांगितले की चेंडू नवीन असताना अधिक वळत होता. तो म्हणाला, 'खरंतर जुन्या चेंडूपेक्षा नवीन चेंडू जास्त वळत होता. चेंडू ज्याप्रकारे वळत होता, ज्याप्रकारे उसळी घेत होता, त्यामुळे आम्ही चकीत झालो. पण आम्ही यातून सावरलो आणि जोपर्यंत मी आणि सूर्या जोपर्यंत फलंदाजी करत होतो, तोपर्यंत आमचे आव्हान कायम होते.'

या सामन्यात भारताने न्यूझीलंडने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 15 धावांवरच पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर हार्दिक पंड्या (21) आणि सूर्यकुमार यादव (47) यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली होती. मात्र हे दोघे चार चेंडूंच्या अंतरात पाठोपाठ बाद झाले.

त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 28 चेंडूत 50 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला 20 षटकात 9 बाद 155 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने 52 धावांची खेळी केली, तसेच डॅरिल मिशेलने नाबाद 59 धावांची खेळी केली. तसेच फिन ऍलेनने महत्त्वपूर्ण 35 धावांची खेळी केली.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. मात्र, भारताकडून अर्शदीप सिंगने गोलंदाजी केलेले अखेरचे षटक महागडे ठरले. त्याने या षटकात तब्बल 26 धावा दिल्या.

याबद्दल देखील हार्दिकने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, 'मला वाटत नाही की या खेळपट्टीवर 177 धावा होऊ शकत होत्या. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही, आम्ही 20-25 धावा ज्यादाच्या दिल्या. हा युवा संघ आहे आणि आम्ही यातून फक्त शिकू शकतो.'

(Washington against New Zealand than India against New Zealand says Hardik Pandya)

त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजी आणि गोलंदाजीत दिलेल्या योगदानाबद्दल हार्दिक म्हणाला, 'त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण केले, त्यावरून असे वाटत होते की भारतीय संघापेक्षा न्यूझीलंडविरुद्ध आज वॉशिंग्टन सुंदरच खेळतोय.'

'आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूची आवश्यकता आहे आणि सुंदरने आम्हाला त्याच्याबाबतीत विश्वास दिला. जर तो आणि अक्षरने यापुढेही असा खेळ कायम करू शकतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला मदतच मिळेल.'

आता भारताला या मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी रविवारी होणारा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. तसेच न्यूझीलंडही सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: विठ्ठलापूरच्या शाळेचे वर्चस्व कायम, पटसंख्येत वाढ; इंग्रजीच्या आक्रमणानंतरही 'नंबर वन'चे स्थान अबाधित

Sanju Samson Century: 6,6,6,6,6,... आशिया चषकापूर्वी संजू सॅमसनचं वादळ, 42 चेंडूत झळकावलं शानदार शतक

Cunculim: सावधान! कुंकळ्ळीतील प्रदूषण आणखी वाढणार, 'फिश मिल'साठी घाट; बड्या राजकीय पुढाऱ्याची भागीदारी

Goa Politics: मंत्री तवडकर शिक्षण खात्यासाठी उत्सुक; आज खातेवाटप शक्‍य, उत्कंठा शिगेला

Porvorim: चतुर्थीनंतर पर्वरीत वाहतूक मार्ग बदल, पांढऱ्या भुकटीचा त्रास असह्य; वाहनचालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT