IND vs NZ: सूर्याचा जलवा कायम! धोनी-रैनाला टाकले मागे; टॉप 5 फलंदाजांच्या यादीत समावेश

IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवचे कारकिर्दीतील 14वे अर्धशतक तीन धावांनी हुकले.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवचे कारकिर्दीतील 14वे अर्धशतक तीन धावांनी हुकले. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापूर्वीच तो बाद झाला. सूर्याने 34 चेंडूत 6 चौकारांसह 2 षटकारांसह 47 धावा केल्या.

या खेळीचा भारतीय संघाला फारसा फायदा झाला नाही, परंतु त्याने एक मोठा टप्पा गाठला. गेल्या वर्षभरापासून सातत्याने धावा करणाऱ्या सूर्याने भारतीय क्रिकेटमधील दोन मोठ्या दिग्गजांना मागे टाकले आहे.

सूर्याने धोनी आणि रैनाला मागे टाकले

महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना हे दोन्ही खेळाडू क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील यशस्वी फलंदाज मानले जातात. या दोघांनी आपल्या बॅटने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्याने धोनी आणि रैना या दोघांनाही मागे टाकले आहे. या डावात 40 धावा करताच सूर्यकुमारने कॅप्टन कूल एमएस धोनीला मागे सोडले. याआधी, त्याने याच डावात 28 धावा पूर्ण करुन रैनाला मागे टाकले.

Suryakumar Yadav
IND vs NZ, 1st T20I: किंवीना आस्मान दाखवण्यासाठी पंड्या ब्रिगेड सज्ज, पाहा Playing XI

सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये 'सूर्या'

न्यूझीलंडविरुद्धच्या या खेळीनंतर, सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 46 सामन्यांच्या 44 डावांमध्ये एकूण 1625 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत 98 सामन्यांच्या 85 डावांमध्ये 1617 धावा केल्या, तर सुरेश रैनाने 798 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 1605 धावा केल्या.

तसेच, या यादीत पहिल्या क्रमांकावर महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे, ज्याने 115 सामन्यांच्या 107 डावांमध्ये सर्वाधिक 4008 धावा केल्या आहेत. दुसरा क्रमांक कर्णधार रोहित शर्माचा आहे, ज्याच्या बॅटने त्याने 148 सामन्यांच्या 140 डावांमध्ये 3853 धावा केल्या आहेत. या यादीत केएल राहुल 2265 धावांसह तिसऱ्या स्थानावर असून शिखर धवन 1759 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

Suryakumar Yadav
IND vs NZ: धोनीसमोरच विकेटकीपर ईशान किशनची चपळाई, डायरेक्ट हिटवर ब्रेसवेल रनआऊट; Video

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

  • विराट कोहली – 4008 धावा

  • रोहित शर्मा – 38543 धावा

  • केएल राहुल - 2265

  • शिखर धवन – 1759

  • सूर्यकुमार यादव – 1625 धावा

  • एमएस धोनी - 1617 धावा

  • सुरेश रैना - 1605 धावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com