Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत षटकारांचा पाऊस, बनला वर्ल्ड रेकॉर्ड!

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे.

Manish Jadhav

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या असून प्रत्युत्तरात भारताने 219 धावांवर सात विकेट गमावल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत षटकारांचा पाऊस पडला, त्यामुळे या मालिकेची रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली. खरं तर, या मालिकेत आतापर्यंत एकूण 75 हून अधिक षटकार मारले गेले आहेत, जे एका कसोटी मालिकेतील सर्वाधिक षटकार आहेत.

दरम्यान, या मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिका 2023 च्या नावावर होता. या मालिकेत एकूण 74 षटकार मारले गेले होते.

या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ॲशेस मालिका (2013/14), ज्यामध्ये 65 षटकार मारले गेले. यादीत चौथ्या स्थानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका आहे (2019), ज्यामध्ये 65 षटकार मारले गेले. 2014 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात 59 षटकार मारले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सलामीवीर यशस्वी जयस्वालने एकट्याने 23 षटकार ठोकले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आहे, ज्याने 6 षटकार ठोकले आहेत.

कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार

75 भारत विरुद्ध इंग्लंड 2024*

74 इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस 2023

65 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ऍशेस 2013/14

65 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2019

59 पाक विरुद्ध न्यूझीलंड, UAE 2014

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT