IND vs ENG Pitch Report Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

Wankhede Stadium Pitch Report: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि रोमांचक लढत आता मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Manish Jadhav

Wankhede Stadium Pitch Report: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि रोमांचक लढत आता मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. T20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान भारत आणि बलाढ्य इंग्लंड समोरासमोर ठाकणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत वर्चस्व गाजवले असून, घरच्या मैदानावर इंग्लंडला धूळ चारुन फायनलचे तिकीट पक्के करण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.

टीम इंडियाचे पुनरागमन आणि फॉर्म

सुपर-8 फेरीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने फिनिक्ससारखी झेप घेतली. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सलग विजय मिळवत भारताने (India) दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः फॉर्मात असून त्याच्या कल्पक नेतृत्वाखाली भारतीय फलंदाज आणि गोलंदाज फॉर्मात परतले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ अजिंक्य राहिला आहे. सुपर-8 मधील सर्व सामने जिंकून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे वानखेडेवर 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.

वानखेडे पिच रिपोर्ट

वानखेडे स्टेडियमची (Wankhede Stadium) खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. लाल माती आणि गवताचा हलका थर यामुळे सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना (Pacers) चांगली उसळी (Bounce) मिळू शकते. तसेच, पॉवरप्लेमध्ये फलंदाजांची कसोटी लागू शकते, मात्र एकदा का फलंदाज स्थिरावला की येथे धावांचा पाऊस पडतो.

याशिवाय, मध्यंतरीच्या षटकांत खेळपट्टी थोडी संथ झाल्यास फिरकीपटूंना स्पिन मिळू शकते. मात्र, वानखेडेची सीमारेषा छोटी असल्याने फिरकीपटूंना सावध राहावे लागेल. या मैदानावर 200 हून अधिक धावांचा डोंगर उभा करणे सहज शक्य आहे. सामन्याच्या उत्तरार्धात 'ड्यूय' (Dew) महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, त्यामुळे गोलंदाजांसाठी चेंडू ग्रीप करणे कठीण होऊ शकते.

ओपनर्सवर असेल विजयाची मदार

दोन्ही संघांकडे आक्रमक सलामी जोडी आहे. जो संघ पॉवरप्लेमध्ये विकेट न गमावता मोठी धावसंख्या उभारेल, त्या संघाचे पारडे जड राहील. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा आणि वानखेडेचा अनुभव पाहता भारताचे पारडे थोडे जड वाटत असले तरी, इंग्लंडच्या फलंदाजीची डेप्थ दुर्लक्षित करुन चालणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bandoda villagers Oppose IIT Project: आयआयटीला बांदोडावासीयांचा विरोध; अन्यथा न्यायालयात जाणार, ग्रामसभेत निर्धार, 'कलम 39 अ' वरही चर्चा

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT