Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ENG: कॅप्टन कूलचं होमग्राऊंड हिटमॅनसाठी लकी, झळकावलयं शानदार द्विशतक; आकडे उडवतील इंग्लिश संघाची झोप

Rohit Sharma Scored Double Hundred In Last Ranchi Test: आता टीम इंडियाला ज्या मैदानावर चौथा कसोटी सामना खेळायचा आहे ते मैदान कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे.

Manish Jadhav

Rohit Sharma Scored Double Hundred In Last Ranchi Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाला ज्या मैदानावर चौथा कसोटी सामना खेळायचा आहे ते मैदान कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे.

रोहितने 5 वर्षांपूर्वी 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे कसोटी सामना खेळला होता. ज्यामध्ये या दिग्गज फलंदाजाने धावांचा डोंगर उभा केला होता. रोहित शर्माच्या या खास खेळीसाठी त्याला 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा भारतीय संघ रांचीमध्ये कसोटी सामना खेळणार असून संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. भारतीय चाहत्यांना आशा आहे की रोहित पुन्हा एकदा 2019 सारखी खास इनिंग खेळेल.

रोहित शर्माने रांची कसोटीत सर्वोत्तम धावसंख्या केली

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्माने शेवटचा कसोटी सामना 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर खेळला होता. त्या सामन्यात रोहितने शानदार फलंदाजी करत 255 चेंडूत 212 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. या खेळीची खास गोष्ट म्हणजे रोहितने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 212 पैकी 148 धावा केल्या होत्या. या खास खेळीसाठी त्याला 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आले होते. भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या फलंदाजाकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल.

राजकोटमध्ये शतक ठोकले

दुसरीकडे, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्माने पहिल्या डावात अप्रतिम शतक झळकावले होते. 33 धावांवर 3 विकेट्स गमाल्याने भारतीय संघ दडपणाखाली होता, त्याचवेळी रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळली. रोहितच्या या खेळीनंतर तो फॉर्मात येण्याची चिन्हे दिसू लागली होती. आता चाहत्यांना पुन्हा एकदा रांची कसोटीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारतीय संघात फलंदाजीत फक्त रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे अनुभवी फलंदाज आहेत. त्यांच्याशिवाय यशस्वी जयस्वाल (7 कसोटी), रजत पाटीदार (2 कसोटी), सर्फराज खान (1 कसोटी) आणि ध्रुव जुरेल (1 कसोटी) यांना आतापर्यंत कसोटी सामने खेळण्याचा फार कमी अनुभव आहे.

मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याकडे टीम इंडियाचे लक्ष्य

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. हैदराबाद कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने शानदार पुनरागमन करत इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. आता कर्णधार रोहित शर्माचे लक्ष्य रांची कसोटी सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेण्याचे असेल. ज्यासाठी स्वतः कर्णधार रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी खेळावी लागणार आहे. मात्र, बुमराहची अनुपस्थिती रांची कसोटीतही भारताला खूप त्रासदायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT