Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे आकडे चिंताजनक, टीम इंडियाची आज लागणार कसोटी!

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये विजयाच्या रथावर स्वार असलेल्या भारतीय संघाचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध आज खेळला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथील एकना स्पोर्ट्स सिटी येथे खेळवला जाईल.

हा सामना जिंकून रोहित अँड कंपनीला उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकायचे आहे. तर दुसरीकडे, इंग्लंडला हा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत.

अशा परिस्थितीत विश्वचषक 2023 चा 29 वा सामना खूपच रोमांचक होणार आहे. चला तर सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया...

एकदिवसीय सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड:

भारत (India) आणि इंग्लंड यांच्यात वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 106 सामने खेळले गेले आहेत. येथे इंग्लिश संघाविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा दिसत आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 57 सामने जिंकले आहेत. तर विरोधी संघाला भारतीय संघाविरुद्ध 44 सामन्यांत यश मिळाले आहे. याशिवाय, तीन सामने अनिर्णित राहिले, तर दोन सामने बरोबरीत सुटले.

भारत आणि इंग्लंडमधील एकूण सामने - 106

भारताचा विजय – 57

इंग्लंडचा विजय – 44

अनिर्णीत – 3

टाय - 2

विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांचा सामना:

विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड (England) आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. येथे टीम इंडियाने तीन सामने जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाला पाच सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय, एक सामना बरोबरीत सुटला.

विश्वचषकातील एकूण सामने – 8

भारताचा विजय – 3

इंग्लंड विजय - 5

टाय - 1

भारत आणि इंग्लंड सामन्यातील मोठा स्कोर:

387/5 – भारत – राजकोट – 2008

366/8 – इंग्लंड – कटक – 2017

भारत आणि इंग्लंड सामन्यातील सर्वात छोटा स्कोर:

132/10 – भारत – लॉर्ड्स – 1975

110/10 – इंग्लंड – ओव्हल – 2022

दोन्ही संघांसाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळणारे खेळाडू:

150 धावा – युवराज सिंग – भारत

158 धावा – अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लंड

दोन्ही संघातील वैयक्तिक सर्वोत्तम गोलंदाज खेळाडू:

19/6 – जसप्रीत बुमराह – भारत

24/6 – रीस टॉपली – इंग्लंड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT