Akash Deep - Rohit Sharma | India vs England Test X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, Test: बुमराहची जागा घेणार पदार्पणवीर आकाश दीप, रांची कसोटीसाठी अशी आहे भारत-इंग्लंडची 'प्लेइंग-11'

India vs England, 4th Test: भारताविरुद्ध रांचीत होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आहे. याच सामन्यातून भारताकडून आकाश दीप पदार्पण करत आहे.

Pranali Kodre

India vs England 4th Test Match in Ranchi, Playing XI :

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्याला शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून आकाश दीपचे पदार्पण

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे. जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचमुळे त्याच्याजागेवर बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो या सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहे.

त्याला राहुल द्रविडच्या हस्ते कसोटी पदार्पणाची कॅप देण्यात आली. तो भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा 313 वा खेळाडू ठरला आहे. याव्यतिरिक्त भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

इंग्लंडच्या संघात दोन बदल

या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. चौथ्या कसोटीसाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शोएब बशीर आणि ऑली रॉबिन्सन यांचे इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. त्यांना मार्क वूड आणि रेहान अहमद यांच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • इंग्लंड - झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टली, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

मालिकेत भारतीय संघ आघाडीवर

या मालिकेतील आत्तापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. तसेच नंतर भारतीय संघाने पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा सामना जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांनंतर भारताने 2-1 अशी आघाडी मालिकेत घेतलेली आहे.

त्यामुळे जर भारताने रांचीत होत असलेला कसोटी सामना जिंकला, तर मालिकेतही विजयी आघाडी घेता येईल. मात्र, जर इंग्लंडने रांची कसोटी जिंकली, तर मालिकेत 2-2 अशी बरोबरी होईल आणि अखेरचा सामना निर्णायक ठरेल.

तसेच जर चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला, तर भारतीय संघच मालिकेत आघाडीवर राहिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

SCROLL FOR NEXT