Sarfaraz Khan  Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ENG: सर्फराज खानला टीम इंडियात संधी मिळताच वडीलांचा आनंद गगनात मावेना; म्हणाले...

India vs England 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. संघातील दोन जाणकार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहेत.

Manish Jadhav

India vs England 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. संघातील दोन जाणकार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहेत. होय, स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हे दोघेही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सर्फराज खानचा संघात समावेश करण्यात आला. सर्फराज खानला टीम इंडियामध्ये स्थान मिळण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. सर्फराज ला संघात स्थान मिळाल्यानंतर त्याचे वडील नौशाद खान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुलाला टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर वडील नौशाद खान यांनी सांगितले की, ''आज सर्फराजला टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. ज्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. खासकरुन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. जिथून सर्फराजला खूप काही शिकायला मिळाले. याशिवाय बीसीसीआय, निवडकर्ते आणि सर्व इच्छुक चाहते. आता आम्हाला आशा आहे की, तो देशासाठीही चांगली कामगिरी करेल आणि जेव्हा टीम इंडिया जिंकेल त्यामध्ये सर्फराजचे योगदान असावे.''

सर्फराजशिवाय आणखी दोन खेळाडूंनी टीम इंडियात संधी मिळाली

सर्फराज खानशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचाही दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. आता टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. जे टीम इंडियासाठी इतके सोपे असणार नाही. पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचे मनोबल वाढले आहे. आता इंग्लंड संघ दुसऱ्या सामन्यातही आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवू इच्छितो. मालिकेतील दुसरा सामना आता 2 फेब्रुवारीपासून राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT