IND U-19 Vs BAN U-19 Dainik Gomantak
क्रीडा

IND U-19 Vs BAN U-19: टीम इंडियाचे Asia Cup च्या उपांत्य फेरीत पॅकअप; बांगलादेशने नोंदवला शानदार विजय

IND U-19 vs BAN U-19 Semi Final: आशिया कपमधील भारतीय संघाचा प्रवास संपला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 4 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

IND U-19 vs BAN U-19 Semi Final: आशिया कपमधील भारतीय संघाचा प्रवास संपला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या पराभवासह भारतीय अंडर-19 संघ आशिया कपमधून बाहेर पडला. दरम्यान, बांगलादेशने उपांत्य फेरीत भारताचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता बांगलादेश 17 डिसेंबरला अंडर 19 आशिया कपची फायनल खेळणार आहे. बांगलादेशने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभूत करुन मोठा धक्का दिला. भारताने दिलेले लक्ष्य बांगलादेशने सहज गाठले.

भारतीय फलंदाजांनी आपली ताकद दाखवली नाही

दरम्यान, भारताने बांगलादेशसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली होती. मात्र, याशिवाय कोणताही खेळाडू विशेष कामगिरी करु शकला नाही, त्यामुळेच संघ केवळ 188 धावांवर आटोपला आणि बांगलादेशला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारतीय संघाने इतके छोटे लक्ष्य ठेवले होते की, त्यांना विजयासाठी गोलंदाजांच्या भक्कम साथीची आवश्यकता होती, परंतु गोलंदाजही फेल ठरले. राज लिंबानीने 2 तर नमन तिवारीने 3 बळी घेतले. याशिवाय अर्शिन कुलकर्णीने एकही विकेट आपल्या नावावर केली नसली, तरी त्याने अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली.

अरिफुल इस्लामने 95 धावांची खेळी खेळली

बांगलादेशचा विस्फोटक फलंदाज अरिफुल इस्लामने अप्रतिम खेळी केली. त्याने 90 चेंडूत 94 धावांची तूफानी खेळी केली. तो एकटा संपूर्ण भारतीय संघावर भारी पडला आणि भारताला पराभूत करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, अहरार अमीमनेही अप्रतिम खेळी केली. त्याने 90 चेंडूत 48 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT