Rohit Sharma | Pat Cummins | WTC Final 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Weather Report: पावसामुळे राखीव दिवशी खेळ? WTC Final ड्रॉ किंवा टाय झाली, तर विजेता कोण, जाणून घ्या

India vs Australia: कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पावसाची शक्यता असून जर सामना ड्रॉ किंवा टाय झाल्यास कोणाला विजेतेपद मिळणार जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia, WTC Final 2023, Weather Report: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान, हे या स्पर्धेचे दुसरे पर्व आहे.

दर दोन वर्षांच्या कालावधीत या स्पर्धेचे एक पर्व खेळवले जाते. या स्पर्धेचे पहिले पर्व 2019 ते 2021 दरम्यान खेळवण्यात आले होते. पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने राखीव दिवशी पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

पण, आता भारतीय संघाने पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वातही अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दरम्यान हा कसोटी सामना असल्याने आणि इंग्लंडला सामना होत असल्याने पावसाची शक्यता, तसेच सामना अनिर्णित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत विजेता संघ कसा ठरवला जाणार, असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

राखीव दिवस

इंग्लंडमध्ये बऱ्याचदा वातावरण सातत्याने बदलताना दिसते. त्यामुळे पावसाची शक्यताही असते. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार असलेल्या अंतिम सामन्यादरम्यान देखील अखेरच्या दोन दिवशी पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राखीव दिवसाचा वापर केला जाऊ शकतो.

नियमाप्रमाणे 12 जून म्हणजेच अंतिम सामन्याचा सहावा दिवस हा राखीव दिवस असणार आहे. राखीव दिवस त्याचवेळी वापरला जाईल, जर पाऊस किंवा इतर कारणामुळे अंतिम सामन्यातील निर्धारित पाच दिवसांपैकी एखाद्या दिवसाचा खेळ वाया गेला असेल. तसेच या परिस्थितीत पाचव्या दिवशी निकाल लागलेला नसेल.

दोन वर्षापूर्वी झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यातही राखीव दिवशी खेळ झाला होता 18 जून 2021 रोजी या सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. त्यामुळे 23 जून या राखीव दिवशी खेळ झाला होता.

जर सामना अनिर्णत किंवा बरोबरी सुटला तर...

जर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणारा कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामन्याचा निकाल अखेरच्या दिवसापर्यंत हाती आला नाही आणि सामना अनिर्णित संपला, तर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद देण्यात येणार आहे.

तसेच हा सामना जर बरोबरीत सुटला, तरी दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT