Venkatesh Prasad slams KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

Venkatesh Prasad: 'तो टॉप 10 ओपनर्समध्येही...': KL राहुल पुन्हा प्रसादच्या निशाण्यावर

वेंकटेश प्रसादने पुन्हा एकदा फॉर्मशी झगडणाऱ्या केएल राहुलवर निशाणा साधला असून कठोर शब्दात टीका केली आहे.

Pranali Kodre

Venkatesh Prasad slams KL Rahul : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू झाला. पण या सामन्यातील पहिल्या डावात देखील केएल राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनी पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात 41 चेंडूत 17 धावा करून नॅथन लायनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तो बाद झाल्यानंतर वेंकटेश प्रसादनी काही ट्वीट करत त्याच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाला प्रसाद?

प्रसादने ट्वीट केले की 'आणि खराब फॉर्म सुरूच आहे. जो खेळाडू स्थिर वाटत नाहीये, तरी त्याच्याबरोबरच कायम राहण्याचा व्यवस्थापनाच्या निर्णयाबाबत ही गोष्ट आहे. गेल्या २० वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये कोणत्याच वरच्या फळीतील फलंदाजाला एवढ्या कमी सरासरीसह इतके कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नसेल, जितकी राहुलला मिळाली.'

प्रसादने पुढे लिहिले, 'अन्य प्रतिभाशाली खेळाडूंची, फॉर्ममधील खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मुद्दान नाकारली जात आहे. शिखरची कसोटी सरासरी 40+ आहे, मयंकची दोन द्विशतकांसह 41+ आहे. शुभमन गिल दमदार फॉर्ममध्ये आहे. सर्फराजची प्रतिक्षा अद्याप संपलेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.'

'केएल राहुलच्या समावेशाने न्यायावरील विश्वासाला तडा बसत आहे. एसएस दास, एस रमेश यांच्याकडे प्रतिभा होती, दोघांचीही सरासरीने 38 पेक्षा जास्त होती, तरी त्यांना 23 पेक्षा जास्त साने खेळता आले नाही. राहुलला दिल्या जाणाऱ्या सातत्याच्या संधीमुळे असे भासत आहे की भारतात फलंदाजी प्रतिभेचा अभाव आहे, जे खरे नाही. गेल्या 5 वर्षात केएल राहुलची सरासरी 47 डावांमध्ये 27 च्या खाली आहे,' असेही प्रसादने ट्वीट केले.

याबरोबरच त्याने आणखी एक ट्वीट केले, ज्यात लिहिले की 'माझ्यामते तो भारतातील सध्याच्या सर्वोत्तम 10 सलामीवीरांमध्येही येत नाही, पण तरीही त्याला अगणित संधी दिली जात आहे. कुलदीप यादव सारख्या खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळवल्यानंतरही पुढच्या सामन्यातून वगळले जाते, यासाठी परिस्थितीनुसार संधी असे कारण दिले जाते. पण मला कोणत्याही परिस्थितीत सध्या केएल राहुलसाठी संधी दिसत नाहीये. निराशाजनक.'

यापूर्वीही प्रसादने साधलेला निशाणा

यापूर्वीही 11 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी कसोटीदरम्यान प्रसादने केएल राहुलच्या फॉर्मवर निशाणा साधला होता. त्यावेळीही त्याने केएल राहुलला सातत्याने मिळत असलेल्या संधीबद्दल भारतीय संघव्यवस्थापनेवर टीका केली होती. तसेच त्याने त्यावेळी पक्षपातीपणाचा आरोपही संघव्यवस्थापनेवर केला होता.

केएल राहुलचा खराब फॉर्म

केएल राहुल सध्या खराब फॉर्मचा समना करत आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतही 20 धावाच करता आल्या होत्या. त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या अखेरच्या 10 डावात 17, 20, 7, 64*, 39, 10, 2, 22, 23, 8 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याच्यावर टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT