Umesh Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Umesh Yadav: वडील गेल्याचं दु:ख विसरत मैदानात उतरला अन् घातली 'या' विक्रमाला गवसणी, पाहा Video

उमेश यादवने इंदूर कसोटीत मिशेल स्टार्कचा क्लीन बोल्ड करत मोठा विक्रम करत कपिल देव, झहीर खानच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Pranali Kodre

India vs Australia: बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने या सामन्यात खेळताना एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव केवळ 109 धावांवर संपला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरत ऑस्ट्रेलियाने आघाडी मिळवली होती. पण भारताकडून पहिल्या दिवशी केवळ रविंद्र जडेजाला विकेट्स घेता आल्या.

मात्र दुसऱ्या दिवशी भारताकडून पहिल्याच सत्रात आर अश्विन आणि उमेश यादव यांनी कमालीची गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या 6 विकेट्स केवळ 11 धावांत घेतल्या. या 6 विकेट्सपैकी उमेशने 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 76.3 षटकात 197 धावांवर संपला.

उमेशचा मोठा विक्रम

उमेशने पहिल्या डावात कॅमेरॉन ग्रीन, मिशेल स्टार्क आणि टॉड मर्फी यांना बाद केले. त्याने ग्रीनला पायचीत पकडले, तर स्टार्क आणि मर्फीला त्रिफळाचीत केले. दरम्यान, स्टार्कचा त्रिफळा उडवत त्याने भारतात 100 कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

उमेशने आत्तापर्यंत 55 कसोटी सामन्यांत 168 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 101 विकेट्स त्याने भारतात घेतल्या आहेत. त्यामुळे तो आता भारतात 100 कसोटी विकेट्स घेणारा भारताचा एकूण 13 वा गोलंदाज ठरला आहे, तर 5 वा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स अनिल कुंबळेने घेतल्या आहेत. त्याने 350 विकेट्स भारतात खेळताना घेतल्या आहेत. तसेच वेगवान गोलंदाजांमध्ये भारतात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा कपिल देव यांनी केला आहे. त्यांनी भारतात 219 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज

219 विकेट्स - कपिल देव (65 कसोटी सामने)

108 विकेट्स - जवागल श्रीनाथ (32 कसोटी सामने)

104 विकेट्स - झहीर खान (70 कसोटी सामने)

104 विकेट्स - इशांत शर्मा (77 कसोटी सामने)

101 विकेट्स - उमेश यादव (31 कसोटी सामने)*

मागील आठवड्यात झाले वडिलांचे निधन

उमेश सध्या मोठ्या दु:खातून सावरत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीपूर्वी घरी जाऊन आला होता. या दु:खातून सावरत असतानाच त्याची तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले. त्यानेही जिद्द दाखवत भारतासाठी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT