Steve Smith | David Warner Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: अन् संकट टळलं! नागपूर-दिल्ली खेळपट्ट्यांना ICC ने दिले 'असे' रेटिंग

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात नागपूर आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या कसोटी सामन्यांतील खेळपट्ट्यांना आयसीसीकडून रेटिंग देण्यात आले आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झाले आहेत. पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला होता. तसेच दुसरा सामना अरुण जेटली स्टेडियमवर झाला होता. आता या दोन्ही सामन्यांच्या खेळपट्टीला आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांकडून रेटिंग देण्यात आले आहे.

आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांनी गुरुवारी या दोन्ही सामन्यांसाठी वापरलेल्या खेळपट्ट्यांना सामन्य (average) असे रेटिंग देण्यात आले आहे. हे दोन्ही सामने तिसऱ्याच दिवशी संपले होते. तसेच दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ दोन डावात अनुक्रमे 177 आणि 91 धावाच करु शकला होता, तर भारताने एकाच डावात 400 धावा करत एका डावाने विजय मिळवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाने खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

तसेच दिल्ली कसोटीतही ऑस्ट्रेलिया संघ दोन डावात अनुक्रमे 263 आणि 113 धावा करू शकला होता, तर भारतीय संघाने 262 आणि 4 बाद 118 धावा धावा केल्या होत्या आणि 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

या दोन्ही कसोटीत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले होते. भारताकडून आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन फिरकीपटूंनी मिळूनच दोन्ही सामन्यांतील ऑस्ट्रेलियाच्या एकूण 40 विकेट्सपैकी 31 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी या दोन्ही कसोटी सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबद्दल कोणताही विरुद्ध रिपोर्ट सादर केलेला नाही. त्यामुळे आनंदाची गोष्ट अशी की या खेळपट्ट्यांना सामन्य रेटिंग देण्यात आल्याने या दोन्ही स्टेडियमला डिमिरिट पाँइंट्स बहाल केले जाणार नाहीत. त्यामुळे कोणतीही कारवाई देखील या दोन्ही ठिकाणांवर होणार नाही.

क्रिकेट नियमांनुसार खेळपट्ट्यांना 6 प्रकारात रेटिंग दिले जाते. यामध्ये खूप चांगली (Very Good), चांगली (Good), सामन्य (Average), सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली (Below Average), वाईट (Poor), अयोग्य (Unfit) अशा 6 प्रकारचे रेटिंग दिले जाते.

यामध्ये सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली, वाईट आणि अयोग्य अशा रेटिंग मिळालेल्या खेळपट्ट्यांच्या स्टेडियमला डिमिरिट पाँइंट दिले जातात.

ऑस्ट्रेलियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली असल्याने ऑस्ट्रेलियन संघासमोर पराभव टाळण्याचे आव्हान आहे. यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदोरला 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. त्यानंतर 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादला चौथा सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

SCROLL FOR NEXT