Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन...! 'रोहित ब्रिगेड' कसोटी मालिकेसाठी सज्ज, पाहा संपूर्ण टाईमटेबल

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.

Pranali Kodre

India vs Australia: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला यजमान भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेपूर्वी महत्त्वाची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरला होणार आहे. दरम्यान, ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (World Test Championship) स्थान पक्के करण्यासाठी महत्त्वाची आहे.

दोन्ही संघांचा जोरदार सराव

या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. पहिल्या सामन्यासाठी नागपूरला येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचे बंगळुरुला चार दिवसांचे सराव शिबिर लागले होते. तिथे त्यांनी फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले.

या शिबिरानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ नागपूरला आला आहे. नागपूरमध्येही त्याने सराव केला आहे. तसेच भारतीय संघ मालिकेला सुरुवात होण्याच्या जवळपास एक आठवडा आधीपासून नागपूरमध्ये सराव करत आहे.

फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल

या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज असून नुकतेच त्यांचे फोटोशूटही पार पडले. 'लाईट, कॅमेरा, ऍक्शन' असे कॅप्शन देत त्यांच्या फोटोशूटचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडूंचा जोश दिसून येत आहे.

मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलिया - भारत उत्सुक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या गेल्या तीन कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या तीनपैकी दोन कसोटी मालिका भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय संघ सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्याच्या प्रयत्नात असेल. तर ऑस्ट्रेलिया देखील भारताविरुद्धच्या कसोटी मालिका विजयासाठी उत्सुक आहेत.

कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 17 ते 22 मार्चदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर (वेळ - स. ९.३० वा.)

17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

17 मार्च - पहिला वनडे, मुंबई

19 मार्च - दुसरा वनडे, विशाखापट्टणम

22 मार्च - तिसरा वनडे, चेन्नई

कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ -

पॅट कमिन्स (कर्णधार), ऍश्टन एगर, स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिशेल स्टार्क, मिशेल स्वीप्सन, डेव्हिड वॉर्नर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT