Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

AUS हरवा, नाहीतर वर्ल्ड कप विसरा...'; या दिग्गज क्रिकेटपटूने हिट मॅन ला दिले आव्हान

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

दैनिक गोमन्तक

Gautam Gambhir on Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ही मालिका जिंकून आगामी T20 विश्वचषकाची तयारी मजबूत करु इच्छितो. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहितला थेट आव्हान दिले आहे.

'ऑस्ट्रेलियाला हरवणे आवश्यक'

आपल्या सडेतोडपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आव्हान दिलं आहे. आगामी टी-20 मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवू शकली नाही, तर वर्ल्ड कप जिंकणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, असे त्याने म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, 'मी हे आधीही बोललो आहे, आणि आता पुन्हा सांगत आहे. आगामी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला (Australia) हरवले नाही, तर टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) जिंकता येणार नाही.'

ऑस्ट्रेलियाला हरवून आत्मविश्वास उंचावला

ऑस्ट्रेलियाला हरवल्याने संघाचा आत्मविश्वास वाढेल. गंभीर पुढे म्हणाला, '2007 च्या टी-20 विश्वचषकावर नजर टाकल्यास, आम्ही त्यांना (Australia) उपांत्य फेरीत पराभूत केले होते. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलिया हा सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी संघांपैकी एक आहे, जर तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला त्यांना पराभूत करावे लागेल.'

15 वर्षांपासून T20 विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहतोय

टीम इंडिया (Team India) गेल्या 15 वर्षांपासून टी-20 वर्ल्ड ट्रॉफीची वाट पाहत आहेत. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला एकदाही हा करंडक जिंकता आलेला नाही. विशेष बाब म्हणजे, गौतम गंभीर 2007 टी-20 विश्वविजेत्या संघाचा भाग होता. या सामन्यात सलामीवीर म्हणून त्याने 75 धावांची शानदार खेळीही खेळली होती. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT