Virat Kohli | Steve Smith | India vs Australia Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: विराटचं द्विशतक हुकलं, पण ऑस्ट्रेलियन टीमच्या खिलाडूवृत्तीनं मन जिंकलं, पाहा Video

Video: विराट बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Pranali Kodre

Steve Smith Congratulate Virat Kohli for 75th Century: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दीडशतकी खेळी केली. दरम्यान, त्याचे द्विशतक थोडक्यात हुकले.

भारताच्या पहिल्या डावात विराटने 364 चेंडूत 186 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार मारले. पण त्याचे आठवे द्विशतक केवळ 14 धावांनी हुकले. त्याला 179 व्या षटकात टॉड मर्फीने बाद केले. विराटने मर्फीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण डीप मिड-विकेटच्या क्षेत्रात मार्नस लॅब्युशेनने विराटचा शानदार झेल घेतला. त्यामुळे विराटला माघारी परतावे लागले.

विराटच्या विकेटने भारताचा डावही 9 बाद 571 धावांवर संपला. भारताकडून श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवली खिलाडूवृत्ती

दरम्यान, विराट बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ लगेचच त्याच्याकडे धावत आला आणि त्याने त्याचे अभिनंदन करत त्याच्या खेळीबद्दल आदर व्यक्त केला. स्मिथनंतर मर्फी आणि नॅथन लायननेही विराटचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीबद्दल सध्या त्यांचे कौतुक होत आहे.

विराटचे 28 वे कसोटी शतक

विराट कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक आहे. तो 28 कसोटी शतके करणारा 19 वा खेळाडू ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे विराटने त्याच्या कारकिर्दीतील 27 वे कसोटी शतक तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 1205 दिवसांपूर्वी 23 नोव्हेंबर 2023 रोजी केले होते. त्याने हे शतक कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते.

तसेच अहमदाबाद कसोटीत केलेले विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक ठरले. त्यामुळे तो सचिन तेंडुलकरनंतर 75 आंतरराष्ट्रीय शतके करणारा दुसराच खेळाडू आहे.

भारताची आघाडी

अहमदाबाद कसोटीतील चौथा सामना संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 3 धावा केल्या आहेत. अद्याप ऑस्ट्रेलिया 88 धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्याने 91 धावांची आघाडी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

SCROLL FOR NEXT