Rohit Sharma | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 'तो खोकत होता, पण...', विराटच्या आरोग्याबद्दल कॅप्टन रोहितचं मोठं भाष्य

India vs Australia: अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने शतकी खेळी करण्यावेळी आजारी असल्याचे अनुष्का शर्माने तिच्या पोस्टमधून सांगितले होते, आता याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहितने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma on Virat Kohli's Health: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच चार सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला, पण या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने केलेली दीडशतकी खेळी लक्षवेधक ठरली.

या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात विराट कोहलीने 186 धावांची मोठी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याला अक्षर पटेलकडून (79) चांगली साथही मिळाली. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारीही झाली. दरम्यान, ही खेळी करताना विराट आजारी होता का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबद्दल आता भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने जेव्हा ही खेळी केली, तेव्हा त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने विराटचा फोटो शेअर करताना लिहिले होते, 'आजारपणातही या शांत राहत खेळला, मला नेहमीच तू प्रेरणा देतो.' तिच्या या पोस्टनंतर तो आजारी असल्याचे सर्वांना कळाले होते.

मात्र, चौथ्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटच्या आजारपणाबद्दल बोलताना अक्षर हसत म्हणाला होता, 'मला माहित नाही. तो ज्याप्रकारे एकेरी-दुहेरी धावा घेत होता, त्यावरून तो आजारी असल्याचे वाटत नव्हते.'

त्यामुळे त्याच्या आरोग्याबद्दल चाहत्यांना प्रश्न पडले होते. चौथ्या सामन्यानंतर रोहितला देखील याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला, 'मला वाटत नाही की तो खूप आजारी होता. तो थोडा खोकत नक्कीच होता, पण मला वाटत नाही की त्याची तब्येत फार बिघडली होती.' याबरोबरच रोहितने विराटच्या खेळीचे कौतुकही केले आहे.

विराटचे 75 वे शतक

दरम्यान, विराटने अहमदाबाद कसोटीत केलेले शतक हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 75 वे शतक होते. तो सचिन तेंडुलकरनंतर 75 आंतरराष्ट्रीय शतक करणारा दुसराच खेळाडू आहे.

विराटने हे शतक 552 व्या डावात खेळताना पूर्ण केले. त्यामुळे तो सर्वात जलद 75 आंतरराष्ट्रीय शतक करणाराही खेळाडू ठरला. त्याने याबाबत सचिनला मागे टाकले. सचिनने 566 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 75 शतके केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अचानक संकटं येतायेत? राहू-केतूचा अशुभ प्रभाव असू शकतो जबाबदार; वैवाहिक जीवनातील वाद थांबवण्यासाठी शुक्राला करा प्रसन्न

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

SCROLL FOR NEXT