KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: केएल राहुलचा खेळ खल्लास? गेल्या 10 डावातील आकडेवारी पाहाच

केएल राहुल दिल्ली कसोटीतील पहिल्या डावातही स्वस्तात बाद झाल्याने आता त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उभे राहिले आहेत.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे. दरम्यान, या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुल स्वतात बाद झाला आहे, त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांवर पहिल्या डावात सर्वबाद झाल्यावर भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सुरुवात चांगली केली होती. मात्र 46 धावांची भागीदारी झाल्यानंतर केएल राहुल 17 धावांवर बाद झाला.

त्याला 18 व्या षटकात नॅथन लायनने पायचीत पकडले. खरंतर केएल राहुल गेल्या काही काळापासून फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे सातत्याने त्याच्यावर टीकाही होत आहे. दिल्ली कसोटीपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नही विचारला होता.

मात्र, असे असतानाही त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत संघव्यवस्थापनाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले होते. पण यानंतरही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असल्याने आता त्याच्या पुढील सामन्यासाठी त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

केएल राहुलची गेल्या 10 डावातील कामगिरी

केएल राहुलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गेल्या 10 डावातील कामगिरी पाहिली तर त्याला केवळ एकदाच 50 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.

त्याने श्रीलंकाविरुद्ध इडन गार्डन्सवर झालेल्या वनडे सामन्यात नाबाद 64 धावांची खेळी केली होती. याखेळीसह त्याने गेल्या 10 डावांपैकी केवळ दोन वेळात 30 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने 17, 20, 7, 64*, 39, 10, 2, 22, 23, 8 अशा गेल्या 10 डावात धावा केल्या आहेत.

तसेच कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीचा विचार केला, तर त्याने 2022 पासून 6 कसोटी सामन्यात आत्तापर्यंत 10 डावात फलंदाजी केली आहे. या 10 डावांमध्ये त्याने फक्त एकदाच 50 धावांची खेळी केली होती. ही खेळी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला जानेवारी 2022 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात केली होती. त्यानंतर त्याने आत्तापर्यंत 9 डाव खेळले, ज्यामध्ये त्याला 25 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.

त्यामुळे आता त्याची ही कामगिरी पाहाता, त्याच्या संघातील स्थानावर संघव्यवस्थापनेकडून आता विचार केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT