Rohit Sharma on Indian Bowlers  Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma साठी जडेजा, सिराज, अश्विनने कॅप्टन्सीही केली कठीण, जेवतानाही करावा लागतोय विचार; Video

रोहित शर्माने भारतीय गोलंदाजांमुळे त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याबद्दल खुलासा केला आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना शनिवारी (11 फेब्रुवारी) संपला. नागपूरला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने माजी अष्टपैलू इरफान पठाणला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे, याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

नागपूर कसोटीनंतर रोहित शर्माने इरफान पठाणला मुलाखत दिली. यावेळी त्याने खुलासा केला की भारतीय संघातील गोलंदाज त्याला कसा त्रास देतात. त्याने यावेळी असेही सांगितले की जेवतानाही त्याला रणनीतीपेक्षा या गोलंदाजांना कसे समजवायचे याचा विचार करावा लागतो.

रोहित इरफानशी बोलताना म्हणाला, 'त्यांच्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विक्रमाच्या जवळ आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस मैलाचा दगड आहे. कोणी 5 विकेट घेत आहे, कोणी 250 विकेट्स घेत आहे, तर कोणी 450 विकेट्सच्या जवळ आहे. प्रत्येक दिवशी कोणीतरी काहीतरी विक्रम करत आहे.'

'मला खरंच या विक्रमांबद्दल माहित नसतं आणि हे लोक मला येऊन सांगतात, मी 250 च्या जवळ आहे, मला चेंडू दे, मी 450 च्या जवळ आहे, मला चेंडू दे, माझ्या 4 विकेट्स झाल्यात, मला पाचवी विकेट घ्यायची आहे. वनडेमध्ये सिराजने 25 षटकातच त्याच्या 10 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.'

या गमतीशीर मुलाखतीचा व्हिडिओ इरफान पठाणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर युजर्सकडून भन्नाट प्रतिक्रियाही येत आहेत.

भारताने जिंकली नागपूर कसोटी

भारताने नागपूर कसोटीत एका डावानेच विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा सामनावीर ठरला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 अशा मिळून 7 विकेट्स घेतल्या, तसेच त्याने 70 धावांची खेळीही केली.

त्याचबरोबर आर अश्विननेही 8 विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला, तर कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची खेळी केली होती. आता भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पुढील सामना दिल्लीमध्ये 17 फेब्रुवारीपासून खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT