David Warner | Marnus Labuschagne | India vs Australia  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना! हेजलवूडनंतर दिग्गज सलामीवीरही कसोटी मालिकेतून बाहेर

भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून आता जोश हेजलवूड पाठोपाठ प्रमुख फलंदाजही कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या अडचणी सध्या संपताना दिसत नाहीये. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे आता तो या मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळतना दिसणार नाही.

वॉर्नर आता मायदेशी परतणार आहे. त्याला दिल्लीमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजचा चा वेगवान चेंडू हाताला लागला होता. त्यामुळे त्याला या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नव्हती. त्याच्याऐवजी मॅट रेनशॉ याने कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून दुसऱ्या डावात फलंदाजी केली होती.

दरम्यान, या दुखापतीनंतर वॉर्नरच्या हाताचा एक्स-रे काढण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या हाताच्या कोपराला छोटे फ्रॅक्चर झाले आहे. त्याचमुळे त्याला भारताविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामने खेळता येणार नाहीत.

पण असे असले तरी वॉर्नर कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा भारतात येण्याची ऑस्ट्रेलियाला अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध 1 मार्चपासून इंदोर येथे तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे. तसेच 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादला चौथा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर 17 ते 22 मार्चदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

या वनडे मालिकेतील तिन्ही सामने अनुक्रमे 17, 19 आणि 22 मार्च रोजी मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणार आहेत.

वॉर्नर करतोय खराब फॉर्मचा सामना

वॉर्नर सध्या खराब फॉर्मचा सामनाही करत होता. त्याला भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मिळून केवळ 26 धावा करता आल्या होत्या.

(David Warner ruled out of the remainder of Test series)

हेजलवूडही भारत दौऱ्यातून बाहेर

वॉर्नरपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड देखील संपूर्ण भारत दौऱ्यातूनच बाहेर गेला आहे. तो गेल्या काही काळापासून टाचेच्या वरच्या भागातील दुखापतीचा सामना करत होता.

त्याला या दुखापतीमुळे भारताविरुद्ध नागपूर आणि दिल्लीला झालेल्या कसोटी सामन्यांत खेळता आले नव्हते. तो अद्यापही या दुखापतीतून सावरला नसल्याने तो देखील मायदेशी परतणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही मायदेशी परतला आहे. पण तो तिसऱ्या कसोटीपूर्वी पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात सामील होणार आहे.

यामध्ये ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी ही आहे की बोटाच्या दुखापतीतून कॅमेरॉन ग्रीन आणि मिशेल स्टार्क सावरले असून ते तिसरा कसोटी सामना खेळण्यास सज्ज आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT