Steve Smith on India vs Australia 1st Test Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 'अश्विन चांगला गोलंदाज, पण आमच्याकडेही...', पहिल्या कसोटीपूर्वी स्मिथचा मोठा दावा

कसोटी मालिकेत अश्विनचा सामना करण्याबद्दल स्टीव्ह स्मिथने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला असून दोन्ही देशांमध्ये 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर - गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज असल्याचे स्टीव्ह स्मिथने स्पष्ट केले आहे.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाने बंगळुरूमध्ये ४ दिवसीय सराव शिबिर आयोजित केले होते. त्यानंतर ते 6 फेब्रुवारीला पहिल्या कसोटीसाठी नागपूरमध्ये आले आहेत. ऑस्ट्रेलियाने सराव शिबिरादरम्यान भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील काही गोलंदाजांचा नेटमध्ये सामनाही केला आहे. यात आर अश्विनप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या महेश पिठीयाचाही समावेश होता.

या सरावाबद्दलही स्टीव्ह स्मिथने समाधान व्यक्त केले आहे. तसेच त्याने सांगितले आहे की त्याने भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्याबाबत अधिक विचार केलेला नाही.

ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्मिथ म्हणाला, 'आम्ही अनेक ऑफ-स्पिनरविरुद्ध सराव केला आणि महेश त्यातीलच एक होता. अश्विनप्रमाणेच त्याची गोलंदाजी शैली आहे. आम्ही गोष्टींचा अतिविचार केलेला नाही. अश्विन नक्कीच चांगला गोलंदाज आहे. पण आमच्या किटबॅगमध्ये त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शस्त्र आहेत.'

त्याचबरोबर नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीबद्दल देखील स्मिथने त्याची मतं व्यक्त केली आहेत. तो म्हणाला, 'खेळपट्टी सुकलेली आहे, विशेषत: एका बाजूने. मला वाटते फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. महत्त्वाचे म्हणजे डावखुरे फिरकीपटू आमच्या डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध प्रभावी ठरू शकतात. खेळपट्टीची एक भाग खूपच कोरडा आहे.'

पण स्मिथ म्हणाला, त्याने खेळपट्टीचा जास्त विचार केलेला नाही. तो म्हणाला, 'त्यापेक्षा अधिक मला अंदाज आलेला नाही. मला वाटत नाही की चेंडूला फार उसळी मिळेल. मला वाटचे वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी काहिशी स्किडी असेल. कदाचीत सामना जसा पुढे जाईल, तसा चेंडू वर-खाली राहू शकतो.'

संघाच्या तयारीबद्दल स्मिथ म्हणाला, 'आमच्यासाठी बंगळुरूमधील आणि आता नागपूरमधील सराव चांगला झाला. खेळाडूंची तयारी चांगली सुरू आहे. मला वाटते खेळपट्टी स्किडी आणि धीम्या गतीची असेल, पण मी याबद्दल पूर्ण खात्री देऊ शकत नाही.'

याशिवाय स्मिथने बोटाच्या दुखापतीमुळे कॅमेरॉन ग्रीनही पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, 'ग्रीनने वेगवान गोलंदाजांचाही सामना केलेला नाही, त्यामुळे तो पहिली कसोटी खेळण्याची शक्यता कमी आहे.'

ऑस्ट्रेलियाचे मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड हे वेगवान गोलंदाजही दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळणार नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत स्कॉट बोलंड आणि लान्स मॉरिसला संधी देण्याची शक्यता आहे. त्यांच्याबद्दल स्मिथ म्हणाला आहे की ते देखील चांगले गोलंदाज आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 9 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Ind vs Pak: मैदानावर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा, पाकिस्तानी गोलंदाजानं डोळं वटारुन पाहिलं; पण धाकड हरमननंही दिलं चोख प्रत्युत्तर Watch Video

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT