Cameron Green | Usman Khawaja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघ काळी पट्टी बांधून का उतरला अहमदाबाद कसोटीत? जाणून घ्या खरं कारण

भारताविरुद्ध अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरवारपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती. यामागील कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी रात्री उशीरा ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ही दु:खद बातमी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी दिली होती. त्याचमुळे कमिन्सच्या आईच्या सन्मानार्थ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दंडाला काळी पट्टी घालून शुक्रवारी मैदानात उतरले होते. या कृतीतून ऑस्ट्रेलियन संघाने शोक व्यक्त केला आहे.

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार पॅट कमिन्सची आई मारिया गेल्या काही काळापासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होत्या. त्यांची तब्येतही गेल्या काही दिवसात खालावली होती. अखेर त्यांनी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला आहे.

कमिन्स या कठीण काळात त्याच्या घरी कुटुंबासोबत आहे. त्याच्या आईची तब्येत तीन आठवड्यांपूर्वी खालावल्याने तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना संपल्यानंतर मायदेशी परतला होता. त्यानंतर त्याने या काळात कुटुंबाला प्राधान्य देत पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी भारतात न परतण्याचा निर्णय घेतला होता. कमिन्सच्या या निर्णयाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला होता.

त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. दरम्यान, कमिन्स आता भारताविरुद्ध 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात परतू शकतो.

अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीत पहिल्या दोन्ही दिवशी वर्चस्व ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतके केली. ख्वाजाने 422 चेंडूत खेळताना 180 धावांची खेळी केली.

तसेच ग्रीनने 170 चेंडूत 114 धावांची खेळी केली. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनीही चांगली झुंज दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात सहज 450 धावा पार केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT