Pranali Kodre
भारत वि. ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 9 मार्च रोजी सुरुवात झाली.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.
मोदी आणि अल्बानीज यांना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांच्या हस्ते क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील 75 वर्षांच्या मैत्रीचे प्रतिनिधित्व करणारी फ्रेम भेट देण्यात आली.
मोदी आणि अल्बानीज यांनी आपापल्या देशाच्या कर्णधारांना स्पेशल कॅप प्रदान केल्या.
यावेळी मोदी यांनी अल्बानीज यांच्यासह रोहित आणि स्मिथ यांचा हात पकडून तो उंचावला.
कॅप प्रदान सोहळ्यानंतर दोन्ही पंतप्रधानांची मैदानातून सन्मान फेरी झाली.
यानंतर दोन्ही पंतप्रधानांची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी संघातील खेळाडूंशी ओळख करून दिली.
दरम्यान मोदी आणि अल्बानीज यांनी स्टेडियममध्ये बसून पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेतला.