Suryakumar Yadav and Matthew Wade | India vs Australia ICC
क्रीडा

IND vs AUS: 'टॉस हरलो, तरी मॅच...', सलग चौथ्यांदा नाणेफेक गमावल्यावर काय म्हणाला कॅप्टन सूर्या? वाचा

India vs Australia 5th T20I: बंगळुरुमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या पाचव्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 5th T20I at Bengaluru, Playing XI:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा आणि पाचवा टी20 सामना रविवारी (3 डिसेंबर) होत आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे. भारताने अर्शदीप सिंगला दीपक चाहरच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

दीपकला मेडिकल एमर्जन्सी आल्याने तो घरी गेला असल्याचे कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने ख्रिस ग्रीनच्या जागेवर नॅथन एलिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील सलग 4 सामन्यांत नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्विकारली आहे. दरम्यान, गेल्या तीन सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला एकच सामना जिंकता आला आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती आणि सामनाही जिंकला होता.

जेव्हा पाचव्या सामन्यात नाणेफेक हरली, तेव्हा सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडकडे पाहून हसला.

तसेच तो प्रेझेंटेटरशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'मलाही पहिले गोलंदाजी करायला आवडली असती. जोपर्यंत आम्ही जिंकत आहोत, तोपर्यंत नाणेफेक हरल्याने फरक पडत नाही.'

'मी संघाला हेच सांगितले की काहीही बदलू नका. प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा कामगिरी दाखवण्याची संधी आहे, त्यामुळे मैदानात जाऊन खेळाचा आनंद घ्या. ज्यापद्धतीने फलंदाजी फळीने कामगिरी केली आहे, ते पाहून मी इतकेच सांगितले की विश्वास ठेवा आणि अंमलबजावणी करा.'

दरम्यान, या मालिकेत भारताने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अखेरचा सामना होण्यापूर्वीच भारताने मालिकेतील विजय निश्चित केला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग

  • ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, ऍरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड(यष्टीरक्षक/कर्णधार), बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, तन्वीर संघा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT