India Test Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: चौथ्या कसोटीतून ईशान किशनचे होणार पदार्पण? अशी असेल दोन्ही टीमची Playing XI

गुरुवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना सुरू होणार असून या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.

भारतीय संघात दोन बदलांची शक्यता

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होण्याची दाट शक्यता आहे. या सामन्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते. त्याला इंदोरला झालेल्या तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.

तसेच त्याच्या जागेवर तिसरा सामना खेळलेला उमेश यादव चौथ्या सामन्यासाठीही प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहू शकतो. त्याने इंदोरमध्ये फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवरही चांगली कामगिरी केली होती.

शमीनेही या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, शमीला चौथ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर कदाचीत मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते.

याशिवाय भारताच्या गोलंदाजी फळीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तसेच चौथ्या कसोटीतून ईशान किशनचे कसोटी पदार्पण होण्याची शक्यता आहे. त्याला केएस भरतच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.

केएस भरतने पहिल्या तिन्ही सामन्यात चांगले यष्टीरक्षण केले असले, तरी फलंदाजीत तो तिन्ही सामन्यात संघर्ष करताना दिसला आहे. त्यामुळे ईशान किशनला आजमावले जाऊ शकते. ईशान झारखंडसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट नियमितपणे खेळतो, तसेच त्याने या संघाकडून चांगली कामगिरीही केली आहे. त्याचबरोबर तो चांगली फिरकी गोलंदाजी खेळणारा फलंदाजही आहे.

याव्यतिरिक्त भारताच्या फलंदाजी फळीत शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर हे कायम राहण्याचीच शक्यता दाट आहे.

ऑस्ट्रेलिया संघात बदलांची शक्यता कमी

दरम्यान, इंदोर कसोटी जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या सामन्यासाठी बदल होण्याची शक्यता कमी आहे. या कसोटीतही स्टीव्ह स्मिथच पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करता दिसेल.

अहमदाबाद कसोटी महत्त्वाची

सध्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पुढे आहे. त्यामुळे या मालिकेतील पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चौथा कसोटी सामना जिंकावाच लागेल, तर भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यासाठी विजय मिळवावा लागेल, किंवा सामना अनिर्णित राखावा लागेल.

अहमदाबाद कसोटीसाठी असे असतील संभावित प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ - शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया संघ - उस्मान ख्वाजा, ट्रविस हेड, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरे, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'इंडिगो'चा अहंकार अन् केंद्राचे लोटांगण! नियम मोडल्याने देशातील लाखो प्रवाशांना 'मनस्ताप'; सरकारवरही ओढावली नामुष्की-संपादकीय

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

U-11 National Championships: बडोद्यात गोव्याचा डंका! 9 वर्षांच्या अमायरा धुमटकरने राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पटकावले 'ब्राँझपदक'

Cooch Behar Trophy: लाखमोलाची आघाडी! बंगालविरुद्ध अनिर्णित लढत; गोव्याच्या U-19 संघाने पहिल्या डावातील 27 धावांच्या जोरावर गाठली बाद फेरी

Goa Advocate General: बेकायदेशीर कामांमध्ये गोमंतकीयांचाही हात, असं का म्हणाले अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम?

SCROLL FOR NEXT