Ravindra Jadeja - Sanjay Manjrekar
Ravindra Jadeja - Sanjay Manjrekar Dainik Gomantak
क्रीडा

Jadeja - Manjrekar: मैत्रीची नवी सुरुवात? एकमेकांवर आगपाखड करणाऱ्या दोन क्रिकेटरच्या गळाभेटीनं वेधलं लक्ष

Pranali Kodre

Ravindra Jadeja - Sanjay Manjrekar: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील इंदूरला झालेला तिसरा सामना शुक्रवारी (3 मार्च) तिसऱ्याच दिवशी संपला. पण या सामन्यादरम्यान एक खास घटना चाहत्यांना पाहायला मिळाली, ती म्हणजे रविंद्र जडेजा आणि संजय मांजरेकरांची गळाभेट.

खरंतर या दोन आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये यापूर्वी वाद झाल्याचे अनेक क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे. पण आता इंदूर कसोटीदरम्यान या दोघांनी घेतलेल्या गळाभेटीनंतर हे वाद संपून त्यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली आहे का, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

झाले असे की इंदूर कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी क्रिकेट होस्ट जतीन सप्रू, माजी फिरकीपटू हरभजन सिंग मांजरेकरांबरोबर सामन्याचे विश्लेषण करत होते. याचवेळी जडेजा तिथे आला.

त्याने यावेळी जतीन आणि हरभजनला भेटून हात मिळवला, त्यानंतर तो मांजरेकरांकडेही हात मिळवण्यासाठी गेला. त्याचवेळी हरभजन काहीतरी म्हणत होता. ते ऐकत असतानाच हसत जडेजा आणि मांजरेकरांनी गळाभेट घेतली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

वर्ल्डकप 2019 मध्ये झालेला वाद

यापूर्वी साल 2019 मध्ये वनडे वर्ल्डकप सुरू असताना मांजरकरांनी जडेजावर 'बिट्स अँड पिसेस प्लेअर' अशी कमेंट केली होती. 'बिट्स अँड पिसेस प्लेअर' म्हणजे प्रत्येक विभागात पूर्ण योगदान देण्याऐवजी थोडे-थोडे योगदान देणारे खेळाडू.

मांजरकरांच्या या कमेंटवर जडेजाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्याने मांजरेकरांना 'मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलोय, एखाद्याच्या यशाचे कौतुक करत जा,' असे सुनावले होते. तसेच जडेजाने नंतर चांगली कामगिरी करत मांजरेकरांना खेळातूनही चोख उत्तर दिले होते. त्यामुळे त्यानंतर त्यांच्यातील वादाची बरीच चर्चा झाली होती.

इंदूर कसोटीत भारताचा पराभव

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत शुक्रवारी भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभूत केले आणि मालिकेतील भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. आता या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे.

या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील पराभव टाळण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असणार आहे. तर हा सामना अनिर्णित राहिला किंवा जिंकला, तर भारतीय संघ मालिकाही खिशात घालेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT