Mitchell Starc Bowls despite Bleeding Finger Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 3rd Test: जिद्दी स्टार्क! बोटातून रक्त येत होते, तरीही तो बॉलिंग करत राहिला...; Video Viral

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान बोटातून रक्त येत असूनही स्टार्कने गोलंदाजी करण्याची हिंमत दाखवली, त्यामुळे त्याचे सध्या कौतुक होत आहे.

Pranali Kodre

Mitchell Starc Bowls despite Bleeding Finger: इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे आव्हान ठेवले आहे.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने बोटातून रक्त येत असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवली.

झाले असे की सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (2 मार्च) ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली, तर ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीची सुरुवात मिशेल स्टार्कने केली.

पण पहिल्याच षटकात गोलंदाजी करत असताना मिशेल स्टार्कच्या तर्जनीतून रक्त येत होते. पण त्याने तरीही षटक पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. त्याच्या बोटातून येणाऱ्या रक्ताचे डाग त्याच्या जर्सीवरही पडलेले दिसून येत होते.

विशेष म्हणजे स्टार्कने या डावात नंतरही गोलंदाजी करणे सुरू ठेवले. त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरला 26 धावांवर बादही केले. त्यामुळे सध्या स्टार्कने दाखवलेल्या जिद्दीने कौतुक होत आहे.

पूर्ण तंदुरुस्त नसतानाही संघासाठी उतरला मैदानात

खरंतर स्टार्कला दोन महिन्यांपूर्वीच बोटाची दुखापत झाली होती. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत खेळलाही नव्हता. मात्र, तिसऱ्या कसोटीतून पॅट कमिन्स, जोश हेजलवूड हे दोघेही बाहेर पडले असल्याने स्टार्कने बोटाच्या दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त नसतानाही खेळण्याची तयारी दाखवली.

त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलव्हनमध्ये सामील करण्यात आले. त्याच्या समावेशाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीली अनुभवाचीही साथ मिळाली आहे.

सामन्याचा थोडक्यात तपशील

दरम्यान, या कसोटी सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताचा पहिला डाव 109 धावांवरच संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमनने 5 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या 60 धावांच्या खेळीच्या जोरावर 197 धावा करत 88 धावांची आघाडी घेतली. भारताकडून रविंद्र जडेजाने 4 विकेट्स, तर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

भारतीय फलंदाजांना दुसऱ्या डावातही खास काही करता आले नाही. चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.

त्यामुळे भारताचा दुसरा डाव 60.3 षटकात 163 धावांवरच संपला आणि भारताने ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांच आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने 8 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT