Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: दुष्काळात तेरावा! मॅच संपताच ICC कडून इंदूर स्टेडियमवर मोठी कारवाई

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना झालेल्या इंदूरच्या होळकर क्रिकट स्टेडियमवर आयसीसीकडून कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd Test at Indore: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने सव्वा दोन दिवसातच 9 विकेट्सने विजय मिळवला. मात्र आता आयसीसीकडून होळकर क्रिकेट स्टेडियवर कारवाई करण्यात आली आहे.

होळकर क्रिकेट स्टेडियममधील या सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला आयसीसीकडून वाईट (Poor) असे रेटिंग देण्यात आले आहे. याबद्दल आयसीसीनेच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की खेळपट्टी आणि आउटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत या खेळपट्टीला वाईट असा दर्जा देण्यात येत आहे.

तसेच आयसीसीने आता होळकर क्रिकेट स्टेडियमला तीन डिमिरिट पाँइंट्सही दिले आहेत. आयसीसीच्या नियमानुसार पाच वर्षांच्या कालावधीत जर एकाद्या ठिकाणाचे 5 डिमिरिट पाँइंट्स झाले, तर त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यासाठी 12 महिन्यांची बंदी घालण्यात येते.

इंदूरच्या खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण 14 विकेट्स गेल्या होत्या. तसेच या संपूर्ण सामन्यात गेलेल्या 31 विकेट्सपैकी 26 विकेट्स फिरकीपटूंनी काढल्या होत्या, तर 4 विकेट्स वेगवान गोलंदाजांना मिळाल्या होत्या. तसेच एक विकेट रनआऊटच्या रुपात गेली.

दरम्यान, आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ या तिसऱ्या सामन्यातील दोन्ही संघांच्या कर्णधारांशी चर्चा केल्यानंतर खेळपट्टीचा रिपोर्ट आयसीसीकडे सोपवला होता.

ब्रॉड यांनी सांगितल्याप्रमाणे, 'खेळपट्टी खूप कोरडी होती आणि बॅट आणि बॉल यांच्यात समतोल साधला जात नव्हता. सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. सामन्यातील पाचवा चेंडू खेळपट्टीच्या पृष्टभागामुळे खराबही झाला होता. तसेच खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजीसाठी काहीच मदत नव्हती, तसेच संपूर्ण सामन्यात बॉलला अनिश्चित बाऊन्स मिळत होता.'

आता आयसीसीने केल्या या कारवाईविरुद्ध अपील करण्यासाठी बीसीसीआयकडे पुढील 14 दिवसांची मुदत असणार आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार खेळपट्ट्यांना 6 प्रकारात रेटिंग दिले जाते. यामध्ये खूप चांगली (Very Good), चांगली (Good), सामन्य (Average), सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली (Below Average), वाईट (Poor), अयोग्य (Unfit) अशा 6 प्रकारचे रेटिंग दिले जाते.

यामध्ये सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली, वाईट आणि अयोग्य अशा रेटिंग मिळालेल्या खेळपट्ट्यांच्या स्टेडियमला डिमिरिट पाँइंट दिले जातात.

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेत सध्या भारतीय संघ 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे अहमदाबादला 9 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला किंवा सामना अनिर्णित राखला तर मालिकेत भारतीय संघ विजय मिळवू शकतो. पण ऑस्ट्रेलियाला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पुढील सामन्यात विजय आवश्यकच असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT