Rohit Shama | Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 3rd ODI: विजयाची गुढी उभारण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज! पाहा दोन्ही टीमची Playing XI

Chennai ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना चेन्नईत खेळला जात आहे.

Pranali Kodre

India vs Australia 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी (22 मार्च) वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर अर्थात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या वनडेत खेळलेला 11 जणांचा संघच तिसऱ्या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलियन संघात मात्र दोन बदल झाले आहेत. ऍश्टन एगार आणि डेव्हिड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. तसेच कॅमेरॉन ग्रीन संघातून बाहेर झाला आहे. त्याला बरे नसल्याने त्याला खेळण्यात येणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने स्पष्ट केले आहे.

करो वा मरो सामना

चेन्नईत होत असलेला हा सामना दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' म्हणजेच निर्णायक सामना आहे. कारण तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील हा अखेरचा सामना असून सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीवर आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात मुंबईमध्ये भारतीय संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तर विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो ही वनडे मालिकाही खिशात घालेल.

दरम्यान, ही आयपीएल 2023 पूर्वीची भारताची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या आयपीएल संघात सामील होणार आहेत.

असे आहेत 11 जणांचे संघ

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ऍश्टन एगार, सीन ऍबॉट, मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT