Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 2nd Test: पहिल्या दिवशी शमीचा धडाका, जडेजा-अश्विनही चमकले; कांगारुचंही शेपूट वळवळलं

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनी चिवट झुंज देण्याचा प्रयत्न केला.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू झाला. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने 9 षटकात बिनबाद 21 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप पहिल्या डावात 242 धावांनी मागे आहे.

पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर कर्णधार रोहित शर्मा 34 चेंडूत 13 धावांवर नाबाद राहिला. तसेच केएल राहुल 20 चेंडूत 4 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 78.4 षटकात सर्वबाद 263 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 81 धावा केल्या. तसेच पीटर हँड्सकॉम्बने नाबाज 72 धावांची खेळी केली.

दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून सलामीला डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही रचली. मात्र, खेळपट्टीवर स्थिरवत असतानाच वॉर्नरला मोहम्मद शमीने बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

पण यानंतरही ख्वाजाला मार्नस लॅब्युशेन चांगली साथ देत होता. त्यांची भागीदारीही रंगण्यास सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीला आर अश्विन धावून आला आणि त्याने ही धोकादायक जोडी फोडताना 23 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का दिला.

अश्विनने मार्नस लॅब्युशेनला 18 धावांवर आणि उपकर्णधार स्टीव्ह स्मिथला शुन्यावर बाद केले. सलग तीन विकेट्स गमावल्यानंतर ख्वाजाने ट्रेविस हेडसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शमीने हेडला 12 धावांवर माघारी धाडले.

पण यानंतर ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी डाव सावरत अर्धशतकी भागीदारी रचली. त्यांची 59 धावांची भागीदारी रविंद्र जडेजाने तोडत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. त्याने ख्वाजाला बाद केले. ख्वाजाने 125 चेंडूत 81 धावांची खेळी करताना 12 चौकार आणि 1 षटकार मारले. यानंतर पुढच्याच षटकात ऍलेक्स कॅरेला शुन्यावर अश्विनने बाद केले.

त्यामुळे 168 धावांवरच 6 विकेट्स ऑस्ट्रेलियाने गमावल्या होत्या. मात्र नंतर ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. हँड्सकॉम्बला कर्णधार पॅट कमिन्सने साथ देताना 59 धावांची भागीदारी रचली.

कमिन्स 33 धावांवर बाद झाला. त्यानंतर नॅथन लायननेही 26 चेंडूत 10 धावा केल्या, तर पदार्पणवीर मॅथ्यू कुहनेमनने 12 चेंडूत 6 धावा केल्या. अखेर शमीने कुहनेमनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. त्यामुळे हँड्सकॉम्ब नाबाद राहिला.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

Budh Gochar 2026: "धनाचा पाऊस अन् सुखाची बरसात!" 30 एप्रिलपासून 5 राशींची होणार चांदी; बुधाच्या गोचरमुळे चमकणार भाग्य

IPL 2026 Points Table: "आरसीबीचा 'विराट' विजय!" गुजरातला नमवून गुणतालिकेत पटकावलं दुसरं स्थान; प्ले-ऑफच्या दिशेनं आगेकूच

लग्नावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती-पत्नीसह 5 जणांचा मृत्यू; एका निष्पाप प्राण्यानेही गमावला जीव

SCROLL FOR NEXT