IND vs AUS, 2nd Test: भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करुन रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
दिल्लीत खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनोखे शतक झळकावले आहे. रविचंद्रन अश्विनने हा महान विक्रम करताच जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अश्निनने 700 बळी घेण्याचा टप्पा पार केला आहे.
रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 बळी घेत एक मोठा विक्रम केला आहे. रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेसारख्या दिग्गज खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
टीम इंडियाचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये 3 विकेट घेताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा रविचंद्रन अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे.
तसेच, रविचंद्रन अश्विनच्या आधी भारताचा (India) दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 हून अधिक कसोटी बळी घेण्याचा पराक्रम केला होता. अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 111 कसोटी बळी घेतले आहेत.
दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत 90 कसोटी सामन्यांच्या 169 डावांमध्ये 460 विकेट्स घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 विकेट्स घेतल्या आहेत, तर 65 टी-20मध्ये 72 विकेट्स आणि आयपीएलच्या 184 सामन्यांमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत.
1. अनिल कुंबळे - 111 कसोटी बळी
2. रविचंद्रन अश्विन - 100 कसोटी बळी
3. हरभजन सिंग - 95 कसोटी बळी
37 कसोटी डाव
विकेट - 100
सरासरी - 29.21
पाच विकेट हॉल - 6
सर्वोत्तम गोलंदाजी आकडे - 7/103
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 800 कसोटी विकेट्स
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - 708 कसोटी विकेट्स
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - 677 कसोटी विकेट्स
4. अनिल कुंबळे (भारत) - 619 कसोटी विकेट्स
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 567 कसोटी विकेट्स
6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 563 कसोटी विकेट्स
7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) - 519 कसोटी विकेट्स
8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 461 कसोटी विकेट्स
9. रविचंद्रन अश्विन (भारत) - 460 कसोटी विकेट्स
1. अनिल कुंबळे - 619 कसोटी विकेट्स
2. रविचंद्रन अश्विन - 460 कसोटी विकेट्स
3. कपिल देव - 434 कसोटी विकेट्स
4. हरभजन सिंग - 417 कसोटी विकेट्स
5. ईशांत शर्मा/झहीर खान - 311 कसोटी विकेट्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.