Rohit Sharma | Suryakumar Yadav | Rahul Dravid | India vs Australia Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: पहिल्या कसोटीतून सूर्यासह 'या' दोन खेळाडूंचेही पदार्पण, पाहा दोन्ही संघांचे Playing XI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीतून तीन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून बॉर्डर - गावसकर ट्रॉफी म्हणजेच 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे.

या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Surya Kuman Yadav Test Debut)

या सामन्यातून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातून मिळून एकूण तीन खेळाडूंचे कसोटी पदार्पण झाले आहे. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक केएस भारत यांचे पदार्पण झाले आहे. त्यामुळे ते भारताकडून कसोटी खेळणारे 304 आणि 305 वे खेळाडू ठरले आहेत.

तसेच ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू टॉड मर्फीचे कसोटी पदार्पण झाले आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा एकूण 465 वा खेळाडू ठरला आहे.

गिलला संधी नाही

पहिल्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा क्रिकेटपटू शुभमन गिलला संधी देण्यात आलेली नाही. शुभमन गेल्या महिन्याभरापासून दमदार फॉर्ममध्ये आहे. असे असतानाही त्याला संधी देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटीत सूर्यकुमार की गिल यांच्यातील कोणाला संधी मिळणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थितीत होत होता. पहिल्या सामन्याच्या पूर्व संध्येला याबद्दल कर्णधार रोहित शर्माला प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यावर रोहितने उत्तर दिले होते की परिस्थिती आणि खेळपट्टी अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.

संघाचे संयोजन

दरम्यान, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंना संधी मिळाली आहे. हे तिघेही अष्टपैलू खेळाडू म्हणूनही भूमिका बजावतील. याशिवाय वेगवान गोलंदाजीसाठी भारताकडे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा पर्याय आहे.

दरम्यान, हा सामना रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच्यासाठी पुनरागमनाचा कसोटी सामनाही आहे. हे दोघेही गेल्या काही महिन्यात दुखापतीमुळे कसोटी सामने खेळू शकले नव्हते. तसेच भारताच्या संघात केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली हे प्रमुख फलंदाजही आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाबद्दल सांगायचे झाल्यास संघात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ आणि पीटर रेनशॉ हे फलंदाज आहेत. तसेच ऍलेक्स कॅरी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.

त्याचबरोबर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड हे वेगवान गोलंदाजीचे पर्याय असून मर्फीसह अनुभवी नॅथन लायनवर फिरकी गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त असेल. याशिवाय स्मिथ आणि लॅब्युशानेही या सामन्यात फिरकी गोलंदाजी करताना दिसू शकतात.

असे आहे दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT