Mohammad Shami
Mohammad Shami  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS Video: शमी-सिराजचे ऑसी ओपनर्सला जबरदस्त धक्के! पहिल्या कसोटीत टीम इंडियाची दमदार सुरुवात

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, पहिल्या सामन्याच्या सुरुवातीलाच भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के दिले.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर सलामीला फलंदाजीला उतरले. मात्र पहिल्याच डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला पायचीत केले.

दरम्यान, सुरुवातीला पंचांनी आधी ख्वाजाला नाबाद घोषित केले होते. मात्र, सिराजने कर्णधार रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्याची विनंती केली. त्यावर रोहितने यष्टीरक्षक केएस भरतबरोबर संवाद साधत रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये ख्वाजा बाद असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला १ धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने वॉर्नरलाही १ धावेवरच माघारी धाडले. शमीने गुड लेंथवर टाकलेला चेंडूवर बचावात्मक खेळण्याचा वॉर्नरचा प्रयत्न होता. मात्र, चेंडू वेगात जात थेट ऑफ स्टंपवर आदळला. त्यामुळे वॉर्नलाही आपली विकेट गमवावी लागली.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या तीनच षटकात दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमवाव्या लागल्याने मोठा धक्का बसला. पण नंतर मार्नस लॅब्युशेन आणि स्टीव्हन स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे.

(Mohammad Shami and Mohammed Siraj gave India super start as they get out Australian openers)

तीन खेळाडूंचे पदार्पण

दरम्यान, नागपूरला होत असलेल्या पहिल्या कसोटीतून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांकडून मिळून तीन खेळाडूंचे कसोटी पदार्पण झाले आहे. भारताकडून फलंदाज सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यांचे पदार्पण झाले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू टॉड मर्फीचे पदार्पण झाले आहे.

असे आहे दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT