India vs Afghanistan X/ICC
क्रीडा

IND vs AFG: रोहितने जिंकला टॉस! विराट-जयस्वालला टीम इंडियात संधी, 'हे' दोन खेळाडू बाहेर; पाहा 'प्लेइंग-11'

India vs Afghanistan: विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore, Playing XI:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरू असून दुसरा सामना रविवारी (14 जानेवारी) होत आहे. हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होत असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांना या सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे.

विराटचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तब्बल 14 महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे. त्याने यापूर्वी अखेरचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत खेळला होता.

दरम्यान, विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणाने विश्रांती घेतल्याने खेळण्यासाठी उपलब्ध नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध झाला असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.

तसेच पहिल्या टी२० सामन्यात मांडीच्या वेदनेमुळे यशस्वी जयस्वाल खेळू शकला नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त झाला असल्याने त्याचेही प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.

अफगाणिस्ताननेही दुसऱ्या टी20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. अफगाणिस्तानने रेहमत शाहच्या जागेवर नूर अहमदला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

  • अफगाणिस्तान - रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान(कर्णधार), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान

भारतीय संघाला मालिका विजयाची संधी

अफगाणिस्तानविरुद्ध मोहालीला झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाने या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे भारतीय संघाला दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. पण जर दुसरा सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर मालिकेत बरोबरी होईल आणि तिसरा टी20 सामना निर्णायक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT