South Africa Team  Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SA: कसोटीत आफ्रिकेचा रेकॉर्ड 'खतरनाक'; अझहरपासून कोहलीपर्यंत सर्व कर्णधार ठरले अपयशी

India vs South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

Manish Jadhav

India vs South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. जवळपास 31 वर्षे झाली आहेत, पण टीम इंडिया अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकण्याची वाट पाहत आहे. यावेळी टी म इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत खेळवली जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल.

दक्षिण आफ्रिकेत भारताला एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही

दरम्यान, मोहम्मद अझरुद्दीन टीम इंडियाचा कर्णधार असताना 1992 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 1992 च्या दौऱ्यासह एकूण 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 8 पैकी 7 कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारताने इथे कसोटी मालिका अनिर्णित ठेवली होती. 2010-2011 दौऱ्यात भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकमेव कसोटी मालिका अनिर्णित ठेवली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिकेत भारताचा रेकॉर्ड

1. 1992-1993 दौरा (4 कसोटी सामन्यांची मालिका) - दक्षिण आफ्रिकेने भारताला 1-0 ने पराभूत केले

2. 1996-1997 दौरा (3 कसोटी सामन्यांची मालिका) - दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-0 असा पराभव केला

3. 2001-2002 दौरा (2 कसोटी सामन्यांची मालिका) - दक्षिण आफ्रिकेने भारताला 1-0 ने पराभूत केले

4. 2006-2007 दौरा (3 कसोटी सामन्यांची मालिका) - दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-1 असा पराभव केला

5. 2010-2011 दौरा (3 कसोटी सामन्यांची मालिका) - मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली

6. 2013-2014 दौरा (2 कसोटी सामन्यांची मालिका) - दक्षिण आफ्रिकेने भारताला 1-0 ने पराभूत केले

7. 2017-18 दौरा (3 कसोटी मालिका) – दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-1 असा पराभव केला

8. 2021-22 दौरा (3 कसोटी मालिका) – दक्षिण आफ्रिकेने भारताचा 2-1 असा पराभव केला

अझरपासून कोहलीपर्यंत सर्व कर्णधार अपयशी ठरले

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिली कसोटी मालिका खेळली. टीम इंडियाने या दौऱ्यावर 2021-22 मध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली होती. 2021-22 मध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीने दोन सामन्यांमध्ये नेतृत्व केले. केएल राहुलला एका सामन्यासाठी कर्णधार बनवण्यात आले. 1992 पासून आतापर्यंत, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 8 पैकी 7 कसोटी मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 4 कसोटी सामने जिंकता आले आहेत. या कालावधीत दक्षिण आफ्रिकेने 12 कसोटी सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे, तर 7 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT