India Tour of South Africa 2023-24 X/BCCI
क्रीडा

SA vs IND: तीन मालिका, 4 विजय अन् 3 पराभव! असा राहिला भारताचा संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा

South Africa vs India: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा यशस्वी ठरला असून तिन्ही मालिकेत भारताने पराभव स्विकारला नाही. या दौऱ्यातील सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

India tour of South Africa 2023-24:

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (4 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनला झालेल्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान, या सामन्यासह भारताचा महिन्याभराचा दक्षिण आफ्रिका दौराही संपला.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला चालू झाला होता. या दौऱ्यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळणार होता. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने झाली. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. तसेच शेवटी कसोटी मालिका पार पडली.

टी20 मालिकेत बरोबरी

भारताच्या या 2023-24 दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबर 2023 रोजी टी20 मालिकेने झाली. मात्र, या मालिकेतील डर्बनला होणारा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. पण त्यानंतर दोन्ही सामने पार पडले.

१२ डिसेंबर २०२३ रोजी दुसरा सामना गकेबेराला झाला, ज्यातही पावसाचा अडखळा आला होता. मात्र या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळे जोहान्सबर्गला 14 डिसेंबर 2023 रोजी झालेला सामना निर्णायक होता.

तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने तब्बल 106 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ही मालिका भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळला होता.

वनडे मालिकेत विजय

टी20 मालिकेत बरोबरी झाल्यानंतर 17 डिसेंबर 2023 पासून वनडे मालिकेला सुरुवात झाली. जोहान्सबर्गला झालेला पहिला वनडे सामना भारताने ८ विकेट्सने सहज जिंकला. त्यानंतर दुसरा सामना 19 डिसेंबर 2023 रोजी गकेबेराला झाला, ज्यात दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली होती.

तिसरा आणि निर्णायक सामना पार्लला 21 डिसेंबर 2023 रोजी झाला. या सामन्यात 78 धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत भारताचे नेतृत्व केएल राहुलने केले होते.

कसोटी मालिकाही बरोबरीत

वनडे मालिकेनंतर कसोटी मालिका झाली, या मालिकेतून भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे विराट कोहली, रोहित शर्मा, कागिसो रबाडा, मार्को यान्सिन, जसप्रीत बुमराह असे बरेच प्रमुख खेळाडू पुनरागमन करत होते.

या कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डेला म्हणजेच 26 डिसेंबर 2023 रोजी सुरु झाला. सेंच्युरियनला झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला.

त्यानंतर नवीन वर्षात 3 जानेवारी 2024 रोजी केपटाऊनला दुसरा कसोटी सामना सुरु झाला. या सामन्यात भारताने दीडच दिवसात 7 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माने केले.

एकूणच भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा यशस्वी ठरला. भारताने तिन्ही मालिकेत पराभव स्विकारला नाही.

मालिकावीर आणि सर्वाधिक धावा व विकेट्स -

टी20मालिका -

  • सर्वाधिक धावा - सूर्यकुमार यादव (156 धावा)

  • सर्वाधिक विकेट्स - कुलदीप यादव (6 विकेट्स)

  • मालिकावीर - सूर्यकुमार यादव

वनडे मालिका -

  • सर्वाधिक धावा - टोनी डी झोर्झी (228 धावा)

  • सर्वाधिक विकेट्स - अर्शदीप सिंग (10 विकेट्स)

  • मालिकावीर - अर्शदीप सिंग

कसोटी मालिका -

  • सर्वाधिक धावा - डीन एल्गार (201 धावा)

  • सर्वाधिक विकेट्स - जसप्रीत बुमराह (12 विकेट्स)

  • मालिकावीर - डीन एल्गार आणि जसप्रीत बुमराह

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT