Glenn Maxwell AFP
क्रीडा

Glenn Maxwell: मॅक्सवेलसाठी स्वप्नवत भारत दौरा! वर्ल्डकप जिंकलाच, पण अनेक विश्वविक्रम करत घेतला निरोप

Glenn Maxwell India Tour: ग्लेन मॅक्सवेल भारताविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यानंतर मायदेशी परतणार असून त्याच्यासाठी तीन महिन्याचा भारत दौरा अत्यंत यशस्वी ठरला असून त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Pranali Kodre

India vs Australia, Glenn Maxwell:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीला पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम राखले.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने 48 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील चौथे शतक ठरले. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

दरम्यान, हा सामना मॅक्सवेलचा सप्टेंबरपासून सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील अखेरचा सामना ठरला. या सामन्यानंतर तो मायदेशी परतणार आहे. त्याच्यासाठी यंदाचा भारत दौराच अत्यंत यशस्वी ठरला आहे.

तो सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळला होता. हा त्याचा भारत दौऱ्यातील पहिला सामना होता. त्या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार मिळवला होता.

म्हणजेच मॅक्सवेलने या दौऱ्यातील त्याच्या पहिल्या सामन्यात आणि अखेरच्याही सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. तसेच मॅक्सवेलसाठी भारतात ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान झालेली वनडे वर्ल्डकप स्पर्धा देखील खास ठरली होती. त्याने या स्पर्धेत 9 सामन्यांत 400 धावा केल्या होत्या, तसेच 6 विकेट्स घेतल्या होत्या.

विशेष म्हणजे या वर्ल्डकपमध्ये त्याने दोन मोठे विश्वविक्रमही केले. त्याने 7 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 128 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 10 षटकार मारले.

त्यावेळी तो धावांचा पाठलाग करताना वनडेत वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू ठरला होता. तसेच वर्ल्डकपमधील सर्वात जलद द्विशतक करणारा फलंदाजही ठरला होता.

इतकेच नाही, तर 25 ऑक्टोबर रोज नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. या खेळीदरम्यान, त्याने 40 चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्यामुळे मॅक्सवेल वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा क्रिकेटपटू ठरला होता.

सर्वात विशेष बाब म्हणजे वर्ल्डकपमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध विजय मिळवला होता, तेव्हा ऑस्ट्रेलियासाठी विजयी धावा करण्याचा मानही मॅक्सवेललाच मिळाला होता.

या वनडे वर्ल्डकपनंतर आता भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतही मॅक्सवेलचे आपली छाप पाडली असून आता तो या सामन्यातील शानदार कामगिरीनंतर भारताचा निरोप घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT