KL Rahul and Rahul Dravid Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? द्रविडनेच दिले मोठे अपडेट्स

KL Rahul Injury Updates: राहुल द्रविडने केएल राहुलच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स दिले असून तो आशिया चषकात खेळणार की नाही, याबद्दलही माहिती दिली आहे.

Pranali Kodre

India Team Coach Rahul Dravid gave update on KL Rahul availability in Asia Cup 2023:

आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या स्पर्धेतून भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे पुनरागमन होणे अपेक्षित आहे.

मात्र, आता केएल राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. याबद्दल भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

श्रेयस आणि केएल राहुल गेल्या जवळपास 4-5 महिन्यांपासून भारतीय संघातून दुखापतीमुळे दूर होते. श्रेयसच्या पाठीवर, तर केएल राहुलच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी यातून सावरण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) काम केले. त्यानंतर आता दुखापतीतून सावरल्यानंतर त्यांचा आशिया चषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

असे असले तरी केएल राहुलला अजूनही छोटी दुखापत असल्याचे सांगण्यात आले होते. आता तो आशिया चषकातील साखळी फेरीतील दोन सामन्यांना मुकणार असल्याचे द्रविडने स्पष्ट केले आहे.

केएल राहुल भारतीय संघासह श्रीलंकेला न जाता एनसीए, बंगळुरूमध्येच पुढील काही दिवस थांबण्याची शक्यता आहे. त्याचा फिटनेस पुन्हा 4 सप्टेंबर रोजी तपासण्यात येईल. भारताला २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध आणि 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध सामने खेळायचे आहेत. त्यामुळे या दोन्ही सामन्यांसाठी तो उपलब्ध राहणार नाही.

याबद्दल राहुल द्रविड म्हणाला, 'आमच्याबरोबर त्याचा एक आठवडा चांगला होता. त्याची प्रगती चांगली होती. त्याने बऱ्याच गोष्टी केल्या. आम्हाला ज्या मार्गाने जायचे आहे, त्या मार्गावर तो चांगली प्रगती करत आहे.'

'पण, तो आशिया चषकाच्या पहिल्या टप्प्यासाठी उपलब्ध असणार नाही. पुढील काही दिवस आम्ही सामन्यांसाठी प्रवास करत असताना एनसीए त्याच्यावर लक्ष ठेवेल.'

त्याचबरोबर द्रविड म्हणाला, 'आम्ही 4 सप्टेंबर रोजी पुन्हा चाचणी करू आणि त्यानंतर ठरवू. पण संकेत चांगले असून तो चांगली प्रगती करत आहे. मात्र तो पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही.'

दरम्यान, केएल राहुलने 1 मे रोजी त्याचा अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला आहे. तो आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यादरम्यान खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने स्पर्धांत्मक क्रिकेट खेळलेले नाही.

यावर्षीची आशिया चषक स्पर्धा वनडे स्वरुपात खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेत साखळी फेरीसाठी भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे तीन संघ अ गटात आहेत, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ ब गटात आहेत.

साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करणार आहेत. सुपर फोर फेरीतील अव्वल दोन संघात 17 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे अंतिम सामना खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT