क्रीडा

Rohit Sharma म्हणतो भारत-पाकिस्तान फायनल होणार! काय आहेत शक्यता

सध्याच्या आकडेवारीवरून पाकिस्तान श्रीलंका यांच्या आशिया चषक फायनल होणार असं दिसतयं

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय संघाने आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) सुपर फोरमध्ये प्रवेश केला खरा पण, सुपर फोरच्या दोन्ही सामन्यात भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून (India-Srilanka) हार पत्करावी लागली. यामुळे भारताचे आशिया चषकातील आव्हान जवळपास संपृष्टात आले आहे. भारताचे चषकातील अस्तित्व इतर संघाच्या निकालावर अवलंबून आहे. म्हणजे भारताला यासाठी देवाचा धावा करून, आपल्या मनासारखा निकाल लागावा अशी प्रार्थना करावी लागणार आहे. सध्याच्या आकडेवारीवरून पाकिस्तान श्रीलंका यांच्या आशिया चषक फायनल होणार असं दिसतयं.

भारताचा सुपर फोरमधील एक सामना शिल्लक आहे. अफगाणिस्तान सोबत असलेल्या हा सामना भारताला मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. अफगाणिस्तान संघ सध्या मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे भारताला त्यांना हरविण्यासाठी मोठी कसरत लागेल यात शंका नाही. दुसरे म्हणजे, पाकिस्तान श्रीलंका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेला पाकिस्तावर मात करावी लागेल. एवढेच नव्हे तर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा सामना देखील अफगाणिस्तान संघाला जिंकावा लागेल.

थोडक्यात, पाकिस्तान संघाने त्यांचे आगमी दोन्ही सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत गमावले तर, भारताची आशिया कपमधील अस्तित्व टिकून राहिल.

भारत-पाकिस्तान फायनल होणार!

भारतीय कर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेसोबत मिळालेल्या परभवानंतर भारत-पाकिस्तानच्या फायनलबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल होणारच, टेन्शन घेऊ नका. असे उत्तर दिले. त्यामुळे आशिया चषकात भारत पुढे जातो की मायदेशी परत येतो हे सुपर वरील सामने पार पडल्यानंतरच ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT